पंचायत समिती फलटण व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाठार निंबाळकर केंद्र फरांदवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 45 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्घाटन समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आ. दीपक चव्हाण यांनीआपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन पुढील काळामध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये नवनवीन संशोधनाची गोडी निर्माण व्हावी असे म्हटले .वाठार निंबाळकर सारख्या ग्रामीण भागात अशा प्रकारचे विज्ञान प्रदर्शन घेतल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन प्रयोगाची,कल्पकतेची संधी विद्यार्थ्यांना मिळते . सर्व उपकरणाची पाहणी करून झाल्यावर आ. दिपक चव्हाण यांनी सर्व उपकरणांचे कौतुक केले, विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला पं.स.सदस्य श्री .संजय कापसे ,वाठार निंबाळकर गावचे मा. सरपंच अशोक निंबाळकर, विद्यमान सरपंच शारदा भोईटे, विक्रम शिंदे ,प्रकाश तरटे,सुभाष ढालपे, गणेश तांबे इ.मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी गंबरे साहेब यांनी केले ,आभार विस्तारअधिकारी मठपती साहेब यांनी मानले. सूत्रसंचालन केंद्रप्रमुख श्री गजानन शिंदे यांनी केले ,विज्ञान प्रदर्शनाचे संपूर्ण नियोजन केंद्रप्रमुख वि.रा. सावंत यांनी तसेच वाठार निंबाळकर शाळेचे सर्व शिक्षक ,ग्रामस्थ ,पालक यांनी अतिशय उत्कृष्टरित्या केल्याचे दिसून आले.