फलटण , दि. २२ : अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी साप्ताहिक फलटण टुडेचे उपसंपादक व पत्रकार विनायक शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दल साप्ताहिक फलटण टुडेचेवतीने विनायक शिंदे यांचा पुष्पहार देऊन नुकताच सत्कार करण्यात आला.
आदर्की बुद्रुक ता. फलटण येथील दै. ऐक्य फलटण कार्यालयातील जाहिरात व वितरण प्रतिनिधी
व पत्रकार आणि साप्ताहिक फलटण टुडेचे उपसंपादक विनायक शिंदे यांचा साप्ताहिक फलटण टुडेचे संपादक अमोल नाळे, कार्यकारी संपादक प्रविण काकडे व दै. लोकमंथनचे आसू येथील पत्रकार अजित निकम यांच्या हस्ते विनायक शिंदे यांचा नियुक्तीबद्दल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
आखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्था अमरावती या संस्थेच्यावतीने पत्रकार विनायक शिंदे यांची सातारा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून जिल्ह्यातील पत्रकार यांच्या कल्याणासाठी ही संस्था कार्यरत राहणार आहे. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व पत्रकार यांचे हितासाठी अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्था कार्यरत असल्याचे विनायक शिंदे यांनी सांगितले.
विनायक शिंदे यांच्या नियुक्ती बद्दल फलटण तालुका सातारा जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक सहकार राजकीय धार्मिक व पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवरांनी समक्ष भेटून, फोनवरून व सोशल मीडियाचे माध्यमातून अनेकांनी आभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.