डॉ. मंजिरी निंबकर यांच्या मुलांचे ग्रंथालय या पुस्तकाला शासनाचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार जाहिर.

फलटण: (प्रतिनिधी )प्रगत शिक्षण संस्था फलटण व पंचायत समिती फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या  नर्चरिंग अर्ली लिटरसी इन प्रायमरी स्कूल्स इन फलटण ब्लॉक या प्रकल्पांतर्गत फलटण तालुक्यातील १५० गाव ग्रंथालयांची स्थापना करण्यात आली होती.या ग्रंथालयातील ग्रंथपालांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गाव ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढवली.या गाव ग्रंथालयाच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्य विकसित होण्यासाठी मदत झाली.टाटा ट्रस्ट, सीएमफ व युएसएआयडी यांच्या अर्थसाह्यातून हा प्रकल्प सुरू असून या ग्रंथपालांना केलेले मार्गदर्शन व  त्यांना देण्यात आलेल्या उपक्रम याचे मार्गदर्शन असणारे हे पुस्तक प्रगत शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. मंजिरी निंबकर यांनी लिहिले असून ज्योत्स्ना प्रकाशन पुणे यांनी ते प्रकाशित केले आहे. या प्रकल्पांतर्गत  १४५ जिल्हा परिषद व ५ आश्रम शाळांसोबत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी प्रकल्प सुरू आहे.सदर प्रकल्प २०१५ पासून सुरू असून या प्रकल्पांतर्गत शिक्षकांना अभ्यासक्रम आधारित, तंत्रज्ञान विषयक व ग्रंथालय विषयक  प्रशिक्षणे देण्यात येतात एका शिक्षकाला दोन वर्षांमध्ये अभ्यासक्रम आधारित ८प्रशिक्षणे, तंत्रज्ञानाची ३ प्रशिक्षणे व ग्रंथालयाचे ३  प्रशिक्षणे देण्यात येतात अशी एकूण १४ प्रशिक्षणे देण्यात येतात. शिक्षकांना अभ्यास दौऱ्यांचे आयोजन यांमध्ये केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व शिक्षणाधिकारी व उपक्रमशील शिक्षक यांचा समावेश करण्यात येतो.आतापर्यंत भोपाळ येथे २ वेळा वर्धा येथे २ वेळा ठिंबक टू येथे १ वेळा अशा अभ्यास दौऱयाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच ग्रंथालय स्वयंसेवकांचे गोवा येथे आतापर्यंत ४ अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे ग्रंथालय स्वयंसेवकांच्या क्षमतावृद्धीसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.तसेच पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन शिक्षकांनाही या पुस्तकाच्या माध्यमातून विविध उपक्रम घेता येतील.या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये कमला निंबकर बालभवनचे ग्रंथपाल  विद्यादेवी काकडे प्रदीप ढेकळे यांचे योगदान राहिले आहे.
प्रकल्पांतर्गत शाळांना टॅब, प्रोजेक्टर, अॅक्टिव्हीटि कीट,  डिस्प्ले बोर्ड, स्टेशनरी, ग्रंथालयाची पुस्तके, स्टेशनरी त्यामध्ये कागद रंग तेलकट खडू  सर्व प्रकारचे लेखन साहित्य देण्यात आले होते.
हे प्रकल्पाचे चौथे वर्ष आहे 
 या प्रकल्पांतर्गत फलटण तालुक्यातील उपक्रमशील अशा पंधरा शिक्षकांना रिफ्लेक्टिव्ह टीचर म्हणून फेलोशिप देण्यात आली होती.त्यावर शिक्षकांनी उत्कृष्ट काम करून आपले लेख तयार केलेले आहेत ते विविध वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झाले आहेत.
फलटण तालुक्यातील या प्रकल्पांतर्गत बायफ पुणे येथे राज्यस्तरीय बाल साक्षरता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेला  एक शिक्षक व एका ग्रंथपालांनी आपले पेपर या परिषदेमध्ये वाचन करून त्यावर परिसंवादात सहभाग घेतला होता.त्यांनी डॉ. मंजिरी निंबकर यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले होते.त्यांच्या  पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे पद्मश्री बनबिहारी निंबकर, विधान परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,डॉ. चंदा निंबकर, गटविकास अधिकारी अमिता गावडे,पंचायत समिती फलटणच्या  सभापती प्रतिभा धुमाळ,गट शिक्षणाधिकारी रमेश गंबरे, टाटा ट्रस्टच्या अमृता पटवर्धन, प्रकल्पाचे व्यवस्थापक विजय सिंग सर,नगर परिषदेचे शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी अनिल संकपाळ,नगरसेवक सचिन अहिवळेसर, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे,कमला निंबकर शाळेचे मुख्याध्यापक विश्वास जगदाळे,सुवर्णा कुलकर्णी, सर्व शिक्षक,प्रकल्प संचालक प्रकाश अनभुले, प्रकल्प अधिकारी सोमिनाथ घोरपडे सर्व प्रकल्प टीम,सर्व केंद्रप्रमुख,जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक,मुख्याध्यापक यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!