फलटण दि. १७ : येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचालित सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज प्रशालेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शारदीय नवरात्रोत्सव निमित्त विविध क्रीडा स्पर्धा, फणी गेम्स व फूड स्टॊल चे आयोजन केले होते . आर्यमान फौंडेशनच्यावतीने विद्यालयात आयोजित केलेल्या ‘महाभोंडला’ कार्यक्रमास महिला व विद्यार्थीनी यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
महाभोंडला कार्यक्रमास महिला व विद्यार्थीनी यांचा उस्फुर्त प्रतिसाद
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या सदस्या सौ. सविताकाकी सूर्यवंशी बेडके, आर्यमान फौंडेशनच्या सेक्रेटरी सौ. ज्योतीताई सूर्यवंशी बेडके यांच्या हस्ते शारदादेवीची प्रतिष्ठापना,पूजा व आरती करण्यात आली.
शारदोस्तवानिमित्त प्रशालेत भरविण्यात आलेल्या मतदान जागृती रांगोळी स्पर्धा,हस्तकला व चित्रकला प्रदर्शनाचे उदघाटन सौ. सविताकाकी बेडके (सुर्यवंशी) यांच्या हस्ते करण्यात आले .प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘अंकुर ‘या हस्तलिखितांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. शालेय विविध क्रीडा स्पर्धातील विजते खेळाडू, एन एन एम एस आणि एन टी एस स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थिनीना त्यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे सूत्रसंचालन विद्यार्थिनींनी केले . सर्व विद्यार्थिनींचे सौ. सविताकाकी सूर्यवंशी बेडके , सौ. ज्योतीताई सूर्यवंशी बेडके व प्रशालेच्या प्राचार्या सौ. डोईफोडे यांनी कौतुक केले. यानिमित्त सर्व विद्यार्थीनीं, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी संस्थेच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले .
छान मांडणी केली आहे