आसू : येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ श्रीमंत धिरेंद्रराजे निबांळकर-खर्डेकर यांची पदयात्रा संपन्न
255 (अ. जा.) फलटण कोरेगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आणि मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आ. दिपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ फलटण पूूर्व भाागातील आसू ता. फलटण येथे पदयात्रेचे आयोजन श्रीमंत धिरेंद्रराजे निबांळकर-खर्डेकर यांनी केले. यामध्ये पुर्व भागातील युवक मोठया प्रमाणामध्ये सहभागी झाले होते. श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या मार्गदर्शना खाली या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.
फलटण तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्याचे काम श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले असून तालुक्याचा विकास खऱ्या अर्थाने राजे गटानेच केला आहे त्यामुळे तालुक्यातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्ष यांच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन श्रीमंत धिरेंद्रराजे निबांळकर-खर्डेकर यांनी केले.यांनी केले.
खा. शरद पवार हे महाराष्ट्राच्या हितासाठी व बळीराजा टिकावा म्हणून या वयात पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस मित्र पक्षांचे उमेदवार यांच्या पाठीमागे सर्वसामान्य जनतेने उभे राहावे व तालुक्याच्या विकासाला चालना देण्याचे काम मतदारांनी करावे तसेच
शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम खा.शरद पवार यांनी केले असे मत युवा नेते श्रीमंत धिरेंद्रराजे खर्डेकर यांनी व्यक्त केले.