21 आॅक्टोंबर रोजी ग्रामस्थ यांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय

फलटण दि. 12 : वाखरी ता. फलटण येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित छत्रपती शिवाजी हायस्कूलची इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो याची दखल घेवून हा प्रश्न विधानसभा निवडणुक मतदानापुवी न सोडविल्यास सोमवार दि. 21 आॅक्टोंबर रोजी ग्रामस्थ यांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असून निवेदनाची प्रत 255 (अ. जा.) फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी यांना ग्रामस्थ यांनी दिली आहे. 
१९६२ पासून श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित  छत्रपती शिवाजी हायस्कूल वाखरी ता. फलटण येथे सूरु असून हायस्कूलमध्ये  इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे वग सुरु असून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. शिवाजी हायस्कूलची विद्यार्थी संख्या मोठी असून हायस्कूलची इमारत प्रारंभीच्या काळात वाखरी ग्रामस्थांनी स्वखर्चाने बांधली आहे.
सध्या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून इमारतीची परिस्थिती धोकादायक स्वरूपाची झाली आहे. इमारतीचे छत हे पूर्ण कौलारू असून त्यावरील सर्व कौले फुटलेली असल्याने पूर्ण शाळेला गळती लागली आहे .ऐन पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना वर्गांमध्ये शिक्षण घेता येत नाही. पालक यांना आपल्या विद्यार्थ्यांला जीव मुठीत घालून  शाळेत पाठवत आहेत. इमारतीच्या भिंती पूर्ण जीर्ण झालेल्या असून त्या केव्हा पडतील याचा नेम नाही तरी जीवितहानी होण्याचा धोका संभवत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 
शिवाजी हायस्कूलमध्ये कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधा विद्यार्थी यांना उपलब्ध नसल्याने समस्त वाखरी ग्रामस्थ व  परिसरातून संस्था चालक यांच्याबद्दल तीव्र नाराजी व खेद  व्यक्त केला जात आहे. हायस्कूलची इमारतीची जागाही वनविभागाची असल्याचे कारण पुढे करून संस्था चालक इमारतीची डागडूजी करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 
वाखरी येथील शाळा व्यवस्थापन समिती यांच्या बाबतीत आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल करण्यात आली असून त्यानुसार विस्तार अधिकारी , जिल्हा परिषद सातारा यांनी समक्ष शाळेत येऊन पाहणी केली आहे. शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सातारा  यांनी शाळेचा अहवाल शिक्षणाधिकारी सातारा यांना दिला आहे. त्याबाबत अजून कसलीही कार्यवाही  झाली नाही तथापी आता प्रथम सत्र परीक्षा सुरु असून मुलांना गळक्या शाळेत पेपर लिहणे भाग पडत आहे.  इमारत  जीर्ण झाल्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थ,पालक व पदाधिकारी  यांनी याबाबत वाखरी गावांमध्ये प्रभात फेरी काढून शालेय संस्थेचा निषेध केला आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱी यांनी याकडे आगामी विधानसभा मतदानापूर्वी प्रश्न निकाली काढला नाही तर ? समस्त वाखरी गावचे ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 
याबाबतचे निवेदन  जिल्हाधिकारी सातारा, जिल्हा शिक्षण अधिकारी सातारा, उपविभागीय अधिकारी फलटण, पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलिस स्टेशन फलटन व निवडणूक निर्णय अधिकारी फलटण यांना पाठविण्यात आल्या आहेत. निवेदनाच्या प्रतिवर वाखरी गावातील सुमारे तीनशे ते चारशे ग्रामस्थांनी यांच्या सह्य़ा आहेत .
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!