आ.दिपक चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करा : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

फलटण दि. 11 : आ.दिपक चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर 
255 (अ. जा.) फलटण कोरेगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आणि मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आ. दिपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ फलटण पूूर्व भाागातील आसू ता. फलटण येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी उमेदवार आ. दिपक चव्हाण पंचायत समिती उपसभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर धीरेंद्रराजे खर्डेकर संजय कापसे विश्वास गावडे शिवाजीराव माने सरपंच महादेवराव सकुंडे प्रमोद झांबरे यांची उपस्थिती होती. 
 भाजप व मित्रपक्षावतीने उमेदवारी देणारे सदाभाऊ खोत यांनी फलटणच्या जनतेच्या तोंडाला पाने पुसली असून तालुक्यातील जनतेला चुना लावणाऱ्या व स्वतः इतर संस्था गहाण ठेवणारे महाभाग यांना मतदार यांनी धडा या निवडणुकीत शिकवावा. मुख्यमंत्री यांना बारामतीचे पाणी बंद केलेले दिसत आहे परंतु  तालुक्यातील सुजलाम सुफलाम भाग वंचित ठेवण्याचे काम कारणाराबद्दल काही बोलले नाहीत. तालुक्याची अधोगती करणार्यांना जनताच आता त्यांना त्यांची जागा दाखवेल असे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. 
   फलटण तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्याचे काम श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले असून तालुक्याचा विकास खऱ्या अर्थाने राजे गटानेच केला आहे त्यामुळे तालुक्यातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्ष यांच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन श्रीमंत संजीवराजे यांनी केले. 
  खा. शरद पवार  हे महाराष्ट्राच्या हितासाठी व बळीराजा टिकावा म्हणून या वयात पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस मित्र पक्षांचे उमेदवार यांच्या पाठीमागे सर्वसामान्य जनतेने उभे राहावे व तालुक्याच्या विकासाला चालना देण्याचे काम मतदारांनी करावे असे श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी सांगितले. 
शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम खा. शरद पवार यांनी केले असून नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस सरकारने सर्वसामान्य जनतेला अच्छे दिवस दाखविण्याऐवजी घोर फसवणूक केली आहे. फलटण तालुक्यात ही फसवाफसवी कारणारी टोळी कार्यरत असून फसवेगिरी करणारांना त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहन  युवा नेते श्रीमंत धिरेंद्रराजे खर्डेकर यांनी केले.  
  कार्यक्रमास एम के कदम व आनंद पवार यांची ही भाषणे झाली. या सभेस गुणवरे जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी सरपंच उपसरपंच विविध संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित  होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!