लोणंद, दि. 9 : भादे ता खंडाळा येथील सौ ज्योती कृष्णात चव्हाण (वय 33) या ताठेवस्ती येथील खुरीतील तळे नावाच्या शिवारात शेतामध्ये जनावरे आणण्यासाठी गेल्या असताना बुधवार दि. 9 आॅक्टोंबर रोजी
सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास अंगावर वीज पडुन जागीच ठार झाल्या आहेत.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली आधिक माहिती अशी की, भादे ता खंडाळा येथील कृष्णात चव्हाण यांचे भादे गावच्या हद्दीत ताठेवस्ती येथील खुरीतील तळे नावाच्या शिवारात शेत आहे. त्यांची शेतामध्ये नेलेली जनावरे आणण्यासाठी त्यांच्या पत्नी सौ. ज्योती चव्हाण गेल्या असताना बुधवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास वीज पडुन त्या जागीच ठार झाल्या आहेत.
या घटनेनंतर नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी लोणंद येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतू डॉक्टरानी त्यांचा मृत्यु झाला असल्याचे सांगितले. त्यांच्या मृतदेहाचे लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रामधे शवविच्छेदन करुन त्यांचा मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात अंत्यविधीसाठी देण्यात आला आहे.