फलटण, दि. 9 : सासकल व भाडळी बु. ता. फलटण हद्दीत दलितवस्तीला जोडणारा साकव पहिल्याच पावसात आलेल्या पुरामुळे वाहून गेल्याने सासकल गावच्या ग्रामस्थांना रहदारीसाठी जुन्या रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने व रस्त्यावर असणारी काटेरी झुडपे काढून व रस्त्यावर पडलेले खड्डे मुजवावेत अशी मागणी निवेदनात केली होती त्याची दखल प्रशासनाने घेवून कामाला सुरुवात केल्याने प्रशासनाचे ग्रामस्थ यांनी आभार मानले आहेत.
सासकल व भाडळी बु. ता. फलटण हद्दीत मधील सुमारे २ वर्षांपूर्वी मागासवर्गीय निधीतून २६ लाख १४ हजार रुपये खर्च करून दलितवस्तीला जोडणारा साकव बांधण्यात आला होता तो पहिल्याच पावसात आलेल्या पुरामुळे वाहून गेला. सासकल गावच्या ग्रामस्थांना रहदारीसाठी जुन्या रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने व रस्त्यावर काटेरी झुडपे,खड्डे पडले असल्याने रस्त्याने जीव मुठ्ठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. रस्त्यावर आलेली काटेरी झाडे – झुडपे काढून रस्त्यावर असलेले खड्डे तातडीने बुजवावेत म्हणून ग्रामस्थांनी निवेदने दिली होती. या निवेदनाची प्रशासनाने दखल घेऊन रस्त्यावरील काटेरी झुडपे काढण्याचे काम सुरू केले आहे.
प्रशासनाने फलटण दहिवडी या मुख्य रस्त्यापासून सासकल गावठाणास जाणार्या जोड रस्त्याचे काम प्राधान्याने डांबरीकरण करून कायम स्वरूपी रस्त्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जेसेबीच्या सहाय्याने या रस्त्यावरील झाडे व काटेरी झुडपे काढण्याचे काम सुरू केले असून प्रशासनाने वेळीच दाखल घेतल्याने सासकल ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी शिवाजी हरीबा मुळीक, सर्जेराव शंकर मुळीक, अक्षय सुखदेव घोरपडे, अक्षय भानूदास घोरपडे, मंगेश संजय मदने, सचिन भीमराव खुडे, सागर जगताप, दिनेश वाल्मिक मदने, अंकुश बाबा मुळीक, ज्ञानदेव मुळीक, अर्जुन आडके, रुक्मिणी कांताराम सस्ते, सुनीता विजय फरांदे, किसन ज्ञानदेव आडके यांची उपस्थिती होती.