फलटण दि. 8 : येथील लायन्स क्लब व लायन्स् माळजाई उद्यान समिती यांच्या विद्यमाने मंगळवार दि. 8 आॅक्टोंबर रोजी सायंकाळी 6 वाजता माळजाई उद्यान फलटण येथे शाही सिमोलंघन सोहळा व दसरा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्रसिद्ध पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
शाही सिमोलंघन सोहळा व दसरा मेळावा फलटण संस्थानचे अधिपती व विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन होणार आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण नगरपालिकेच्या नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर फलटण पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर व युवा नेते श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शाही सिमोलंघन सोहळा व दसरा मेळावास फलटण शहर व तालुक्यातील नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन माळजाई देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष जगजीवन गरवालिया लायन्स क्लब अध्यक्ष अर्जुन घाडगे माळजाई मंदिर उद्यान समिती चे चेअरमन प्रतापसिंह निंबाळकर व लायनेस अध्यक्षा सुनिता कदम यांनी केले आहे.