जिद्दीने व्यवसाय केला तर तो यशस्वी होतो : मधुकर शेंडगे

फलटण दि. 7 : जिद्दीने व्यवसाय केला तर तो यशस्वी होत असल्याची अनेक उदाहरणे असून असेच एक जिद्दी तरुणाने शून्यातून आपले विश्व निर्माण केले आहे. विजयादशमीच्या शुभ मुहुर्तावर कृष्णा हॉस्पिटलशेजारी ढेबेवाडी फाटा, मलकापूर कराड ता. कराड येथे हॉटेल मथुरा कॅफे व स्नॅक्स  चा उदघाटन समारंभ विविध मान्यवर यांचे हस्ते मंगळवार दि.  8 आॅक्टोंबर रोजी सकाळी ११:०० वाजता होणार आहे.
गुरसाळे ता. खटाव येथील शेंडगे कुटुंबातील मधुकर शंकर शेंडगे याचे शालेय शिक्षण फक्त 12 वी पर्यंत झाले आहे. शिक्षणात मन रमत नसल्याने नोकरी व्यवसाय निमित्त मधुकर शेंडगे कराड येथे आला. प्रारंभी मिळेल ते काम करु लागला. त्यानंतर तो एका चप्पल दुकानात काम करु लागला. 
दुकान मालक यांनी मधुकर यांचा प्रामाणिकपणा व चाणाक्ष नजर ओळखून त्याला तूच का दुकान चालवित नाही असे सांगून नोकरी करणार्‍या या तरुणाला व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून दिली. मग काय मधुकर यानेही पाठीमागे वळून न पाहता जिद्दीने काम करु लागला. 
मधुकर शेंडगे याला त्याची जिद्द काही स्वस्थ बसू देत नसल्याने मग स्वतंत्र व्यवसाय करण्याच्या हेतूने त्याने हॉटेल व्यावसायिक होण्याचे ठरविले. आज त्याने वेगळी वाट चोखाळली असली तरी तो मेहनतीने हा व्यवसाय चालविल यात शंका नाही. उत्तम चव व क्वालिटी ग्राहकांना उपलब्ध करून देण्याबरोबरच विनम्र व तत्पर सेवेमुळे  अल्पावधीत मथुरा कॅफे आणि स्नॅक्स ग्राहकांच्या पसंतीस उतरेल अस विश्वास मधुकर शेंंडगे यांनी व्यक्त केला आहे. 
कराड  येथील मथुरा कॅफे आणि स्नॅक्स उद्घाटन शुभारंभ समारंभास कराड शहर व तालुुक्यातील नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक मधुकर शेंडगे (पिंटू भाऊ) यांनी केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!