फलटण दि. 7 : सार्वजनिक नवरात्र महोत्सव निमित्त श्रीवनदेव विठ्ठलवाडी ता. फलटण येथे समारोपिय प्रवचन सत्र भाविक भक्तांच्या ऊपस्थितीत संप्पन्न झाले.
सार्वजनिक नवरात्र महोत्सव , विठ्ठलवाडी ता. फलटण यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ई.श्री.अमृतराज ( अभिदादा) यांचे प्रवचन संप्पन्न झाले.
सार्वजनिक नवरात्र महोत्सव , विठ्ठलवाडी परिसरातील मंदिर आश्रम याठिकाणी दररोज दुपारी लिळाचरीत्र पोथी व प्रवचन आयोजित करण्यात आले होते.
त.शालनताई मेहकरकर यांनी स्वांमीच्या लीळा सांगुन सर्वांना सुंदर मार्गदर्शनपर विचार सांगितले.
रविवार दि. 6 आॅक्टोंबर रोजी सायंकाळी समारोपिय सत्राच्या निमित्याने त.छायाताई बीडकर
यांनी जीवाचा आचार धर्म या विषयावर प्रवचन केले.
त.वनिताताई कपाटे यांचेही प्रवचन संप्पन्न झाले.
ईश्वराने जीवाला निरोपण केलेले प्रसादसेवेचे महत्व व प्रसन्नतेच्या लीळा सांगुन त्याची यथार्थ महती त्यांनी यावेळी सर्वांना पटवुन सांगितली.
सर्व तपस्विनी माता भगिंनिनी समारोपीय भाषण केले.
सार्वजनिक नवरात्र महोत्सवानिमित्त विठ्ठलवाडी परिसरातील भाविक भक्त यांच्या सह सदभक्तांनी सहभाग घेतला.