महायुतीचे उमेदवार दिगंबर आगवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला

फलटण दि. ४ :२५५ (अ. जा.) फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शुक्रवार दि. ४ आॅक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
स्वराज संघटनेचे दिगंबर रोहिदास आगवणे यांनी महायुतीच्या माध्यमातून भाजपा, शिवसेना, रासप, रिपाई, रयत क्रांती, शिवसंग्राम व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाउ खोत, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार जयकुमार गोरे यांच्यासह महायुतीमधील विविध पक्षांचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, सोसायट्यांचे चेअरमन आणि ज्येष्ठ नागरीक, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. दिपकराव चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सुभाषराव शिंदे श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर बाळासाहेब सोळसकर डी. के. पवार दिलीपसिंह भोसले नगराध्यक्षा सभापती यांच्यासह फलटण नगरपालिका, सातारा जिल्हा परिषद सदस्य, फलटण पंचायत समिती व फलटण तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
 शुक्रवार दि. ४ आॅक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!