लोणंद दि. ३ : लोणंद येथील सेंट अॅन्स इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान व पथनाटयाव्दारे स्वच्छतेचा संदेश दिला.
लोणंद ता. खंडाळा येथील सेंट ॲन्स इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्यावतीने महात्मा गांधी यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांची भव्य रॅली लोणंद गावातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली . प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये स्वच्छता विषयीचा फलक होता. प्लास्टिक बंदी काळाची गरज ओळखून फलक बनवण्यात आले होते. शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींचे यांचे गट पाडून त्यांना लोणंद येथील गावातील प्रत्येक विभागातील परिसर स्वच्छतेसाठी विभागून दिला होता. स्वच्छता जनजागृतीमध्ये शाळेतील प्राचार्य, ऊपप्राचार्य, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
लोणंद ता खंडाळा येथील बाजारतळ ,पोलिस स्टेशन ,काळूबाई मंदिर, वेताळ पेठ थिएटर परिसरातील ठिकाण असणारे सार्वजनिक परिसराची स्वच्छता करण्यात आली .नगरपंचायतीच्या प्रांगणात स्वच्छतेविषयी व प्लास्टीक बंदीविषयी एक पथनाट्य विद्यार्थी यांनी सादर करून एक आगळा वेगळा स्वच्छतेचा संदेशच सेंट अॅन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नागरिक यांना दिला.
नगरपंचायत मधील कर्मचाऱ्यांनी नगरपंचायतीच्या परिसरात उपस्थित असणाऱ्या दुकानदारांना व्यापारी वर्गाला कापडी पिशव्याचे वाटप यावेळी करणेत आले. स्वच्छता रॅलीचा शेवट लोणंद बाजारातळ या ठिकाणी करण्यात आला . सर्व विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. विद्यालयाच्या प्राचार्या सि.विन्सी मारीया व प्रशांत गायकवाड यांनी स्वच्छता व प्लॅस्टीक बंदी का गरजेची याविषयी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यालयाच्या ऊपप्राचार्या सि. ट्रेसी. व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी ऊपस्थित होते. निलेश मुळीक यांनी शेवटी आभार मानले.