फलटण दि. १: आसू ता. फलटण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक श्रीमंत यशवंतराव आप्पासाहेब निंबाळकर उर्फ श्रीमंत दादाराजे खर्डेकर यांचे निधन झालेमुळे रिक्त झालेल्या बँकेच्या संचालक पदावर सोमवार दि. 30 सप्टेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये त्यांचे पुत्र फलटण पंचायत समितीचे उपसभापती श्रीमंत शिवरूपराजे यशवंतराव निंबाळकर उर्फ बाळराजे खर्डेकर यांची एकमताने संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरील कषी पणन संस्था व शेतीमाल प्रक्रिया संस्था, कषी उत्पादन प्रक्रिया सहकारी संस्था (सहकारी साखर कारखाने, आईल मिल, सूतगिरणी) या मतदार संघातील रिक्त झालेल्या जागेसाठी बँकेच्या संचालक मंडळाची सभा झाली. संचालक पदासाठी एकच अज आल्याने श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, संचालक राजेंद्र राजपुरे, दत्तात्रय ढमाळ अनिल देसाई प्रकाश बडेकर अर्जुनराव खाडे प्रदीप विधाते वसंत मानकुमरे संचालिका कांचन साळुंखे सुरेखा पाटील व अन्य संचालक सदस्य बँकेचे अधिकारी हे यावेळी उपस्थित होते.
श्रीमंत शिवरूपराजे यशवंतराव निंबाळकर उर्फ बाळराजे खर्डेकर हे फलटण तालुक्यातील पूूर्व भागातील युवक, सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे अभ्यासू नेेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध आंदोलने केली असूूून यापूर्वी ऊस दराबाबत त्यांनी केलेले आंदोलन यशस्वीरित्या पार पाडून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. फलटण कषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून शेतकरी यांच्यासाठी काम करुन अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावून अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न यापूर्वी केला आहे.
कै. श्रीमंत दादाराजे खर्डेकर यांनी राजकीय शैक्षणिक सामाजिक सहकार क्षेत्रासाठी दिलेले योगदान व केलेले काम प्रेरणादायी असून फलटण तालुक्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी
श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर प्रयत्नशील आहेत.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी श्रीमंत शिवरूपराजे यशवंतराव निंबाळकर उर्फ बाळराजे खर्डेकर यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
श्रीमंत शिवरूपराजे यशवंतराव निंबाळकर उर्फ बाळराजे खर्डेकर यांची सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पदावर बिनविरोध निवड झाल्याबद्दल फलटण तालुक्याचे नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आ. दिपक चव्हाण यांच्यासह सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, अधिकारी व फलटण तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन यांच्यासह अनेकांनी प्रत्यक्ष व फोनद्वारे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.