फलटण, दि. 30 : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालय, फलटण यांचे संयुक्त विद्यमाने मुधोजी महाविद्यालय येथील पटांगणावर आयोजित करण्यात आलेला 39 व्या मध्यवर्ती युवा महोत्सव दि.26 ते 28 सप्टेंबर दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मध्यवर्ती युवा महोत्सवात सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील 110 महाविद्यालयातील 1350 विद्यार्थी यांनी 32 कलाप्रकार सादर करुन स्पर्धेमध्ये उतरल. येथील मुधोजी महाविद्यालय येथील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी 15 कलाप्रकारामध्ये यश मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले आहे.
मुधोजी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या संघाने पाश्चिमात्य एकलगीत प्रथम, स्थळचित्रण द्वितीय, व्यंगचित्रण प्रथम, भिंतीचित्र निर्मिती द्वितीय, कोलाज द्वितीय, स्थळ छायाचित्रण उत्तेजनार्थ, मातीकाम द्वितीय, मेहंदी रचना द्वितीय, एकांकीका द्वितीय, पथनाट्य द्वितीय, लोकनृत्य प्रथम, लोकवाद्यवृंद प्रथम, वादविवाद प्रथम, पाश्चिमात्य समुहगीत प्रथम, सांघीक रचनाकृती द्वितीयव बाबासाहेब माने फिरता चषक जिंकला आहे.
मुधोजी महाविद्यालयातील विजयी स्पर्धक व संघाना शिवाजी विद्यापीठ कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, विद्यार्थी विकास समिती संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, विभागीय सह संचालक डॉ. अजय साळी, प्राचार्य होणगेकर यांचे हस्ते कलाकारांना माजी कुलगुरु आप्पासाहेब पवार फिरता चषक देवून गौरविण्यात आले. यावेळी कलाकार यांनी जल्लोष केला.
यशस्वी व गुणी सर्व विद्यार्थी / विद्यार्थीनी या कलाकारांना महाविद्यालय कलाविष्कार विभाग समितीचे सचिव डॉ. टी.पी. शिंदे, प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, समिती सहसचिव लक्ष्मीकांत वेळेकर, डॉ. डी.डी. विरकर, प्रा. एस.एम.दळवी, डॉ. बी.एस.कांबळे यांच्यासह अन्य सदस्य यांनी मार्गदर्शन केले.
मुधोजी महाविद्यालय फलटण ने प्राप्त केलेल्या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, व्हाईस चेअरमन रमणशेठ दोशी, सचिव संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, अधिक्षक श्रीकांत फडतरे, प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, कॉलेजचे अधिक्षक शिवाजी रासकर, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थी व मार्गदर्शन प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.