फलटण दी. २९ : इटली येथे संपन्न झालेल्या IRONMAN या स्पर्धेत डॉ.प्रणिल प्रभाकर भोईटे यांनी यश संपादन केल्याबद्दल सन्मित्र गणेशोत्सव मंडळ नाना पाटील चौक फलटण चे अध्यक्ष प्रतापसिंह निंबाळकर व उपाध्यक्ष विकास थिटे यांनी त्याचा यथोचित सत्कार केला.
शनिवार दि. २१ सप्टेंबर रोजी इटली येथे “IRONMAN” १४०.६ ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत एकावेळी ३ क्रिडाप्रकार पूर्ण करावे लागतात. डॉ. प्रणिल प्रभाकर भोईटे यांनी प्रथम ३.८ किलोमीटर पोहणे २ तास २० मिनिटामध्ये पूर्ण केले. १८० किलोमीटर सायकल ७ तास आणि ४० मिनिटात चालवून पूर्ण केली तर ४२ किलोमीटर अंतर ६ तास पळून पूर्ण केले. अशारितीने डॉ प्रणिल भोईटे यांनी ही Ironman स्पर्धा १६ तासात पूर्ण केली आहे.
डॉ.प्रणिल भोईटे यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून खेळांमध्ये यश प्राप्त केल्याबद्दल व वेगवेगळ्या मॅरेथॉन आणि सायक्लोथॉन स्पर्धेत यश मिळविले बद्दल त्यांचे अभिनंदन यावेळी मंडळाचेवतीने करण्यात आले.
फलटण शहर तालुक्यातील विविध स्तरावरून डॉ. प्रणिल भोईटे यांचे अभिनंदन होत असुन येथील नामांकित स्त्री रोग तज्ञ डॉ.पी.बी.भोईटे यांचे रेडिओलॉजिस्ट डॉ.प्रणिल प्रभाकर भोईटे हे सुपुत्र आहेत.