श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय फलटण येथे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. देवानंद शिंदे यांनी शनिवार दिनांक 28 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी नऊ वाजता महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेचे मानद सचिव श्री सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बडके) यांनी कुलगुरूंचे स्वागत केले.
महाराष्ट्रामध्ये अतिशय स्वच्छ प्रतिमा असलेले, पारदर्शक कारभार करणारे कुलगुरू म्हणून ओळख असणारे मा. डॉ.देवानंद शिंदे यांनी व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ.डि.के.गायकवाड यांनी भेट देऊन महाविद्यालयाची पाहणी केली. महाविद्यालयात चालू असणाऱ्या तासिका चे निरीक्षण करून त्यांनी महाविद्यालयात कॉमर्स विषयाचा एक तास घेतला.
महाविद्यालयातील टी.वाय.बी कॉम च्या वर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला व मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना त्यांनी सहकार म्हणजे काय ? सहकार मध्ये कोणते कोणते घटक येतात? व्यापार म्हणजे काय ? उद्योग म्हणजे काय? वाणिज्य म्हणजे काय ? कॉमर्स विद्याशाखेचे मधून तुम्ही पुढे काय करणार आहात? हे विचारून त्यांनी टँली,अकांउट, जीएसटी टॅक्स या विषयी मार्गदर्शन केले जगातील सर्वात श्रीमंत लोक आणि ते हलाखीच्या परिस्थितीतून तोंड देऊन कसे श्रीमंत बनले याचे त्यांनी बिल गेट्स यांचे उदाहरण देऊन स्पष्टीकरण केले. यानंतर त्यांनी एफ.वाय.बी.कॉम च्या वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यवस्थापन म्हणजे काय? तसेच कोणकोणत्या ठिकाणी व्यवस्थापन केले जाते? आपल्या जीवनातील पहिला व्यवस्थापन गुरु कोण? असे विचारून ‘आई ‘ हा आपल्या जीवनातील पहिला ‘ व्यवस्थापन गुरू’ होय याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे मानद सचिव सचिनभैय्या यांनी विद्यार्थ्यांना आपण नशिबवान आहात कारण प्रत्यक्षात कुलगुरूंनी आपला तास घेतला.
मा.कुलगुरूंनी महाविद्यालयातील प्राध्यापकांशी कॉलेज संदर्भात आणि प्राध्यापक म्हणून असणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या. कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना नॅक करून घेणेसाठी विद्यापीठ नेहमीच आपल्याला मदत करण्यासाठी तयार आहे.कायम विनाअनुदानित प्राध्यापकांच्या वेतनाविषयी मा.राज्यपालांशी लवकरच चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कुलगुरूंनी प्राध्यापकांना विद्यार्थ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना बोलते करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी बोलले पाहिजे यासाठी प्राध्यापकांनी प्रयत्न करावेत, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन भैय्या सूर्यवंशी यांनी माननीय कुलगुरूंचा संकटमोचक कुलगुरू असा उल्लेख केला. कारण अडचणीच्यावेळी मुंबई विद्यापीठचा कारभार त्यांनी यशस्वीपणे हाताळला. सर्वात जास्त विद्यापिठांमध्ये प्रभारी कुलगुरू म्हणून कामकाज पाहिलेले कुलगुरू म्हणून डॉ. देवानंद शिंदे साहेब यांचा उल्लेख करावा लागेल आणि आपल्या महाविद्यालयाला भेट देणारे पहिले कुलगुरू मा. देवानंद शिंदे हे आहेत असा उल्लेख केला. महाविद्यालयास भेट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले व कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना अनुदान मिळावे, म्हणून राज्यपालांकडे शिफारस करण्याची विनंती केली. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाषराव सूर्यवंशी(बेडके), नियामक मंडळाचे सदस्य श्री.महेंद्र सूर्यवंशी(बेडके), संस्थेचे उपाध्यक्ष व नियामक मंडळातील सदस्य व महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य श्री.एल.के.बोराटे यांनी कुलगुरूंच्या प्रत्यक्ष भेटीमुळे विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळेल असे म्हटले. यावेळी महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.राजेंद्र कुलकर्णी, यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य श्री.अहिवळे बी. एम. पर्यवेक्षक श्री.थोरात सर व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.