फलटण दि. २९ : विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता अनंत मंगल कार्यालय, कोळकी ता. फलटण येथे फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील युवक व कार्यकर्ते यांच्यासाठी युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
फलटण येथील युवा संवाद मेळाव्यामध्ये महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यास आ. दिपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह फलटण व कोरेगाव तालुक्यातील पदाधिकारी व विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
आगामी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक पार्श्वभूमीवर हा युवा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला असून युवा संवाद मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.