सासकल दि. २८ : सुमारे दोन वर्षांपूर्वी सासकल व भाडळी बुद्रुक ता फलटण गावचे हद्दीत मागासवर्गीय निधीतून बांधण्यात आलेला साकव पूल निकृष्ट बांधकाम व चुकीच्या पध्दतीमुळे बाांधण्यातआल्याने व अनाधिकृत वाळू उपसा यामुळे दि. २५ व २६ रोजी झालेल्या पावसात वाहून गेला असून याा पुलाची चौकशी करावी आणि नवीन साकव पुल पुन्हा बांधून द्यावा अशी माागणी ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सासकल व भाडळी बुद्रुक ता. फलटण येथील मागासवर्गीय वस्तीला जोडणारा हा साकव पुल पहिल्या पावसात वाहून गेल्याने ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्या या निकृष्ट केलेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
सासकल व भाडळी बुद्रुक येथील या साकव पुलाची रचना चुकीची झाली असून याठिकाणी येणारे दोन्ही ओढ्याचे पाणी व त्या ठिकाणची भौगोलिक रचना यांचा विचार न करता घाईघाईत साकव पुल बांधण्यात आला होता. पुलासाठी मागासवर्गीय निधीतून खर्च करण्यात आला होता मात्र पहिल्या पावसात साकव पुल वाहून गेल्याने जनतेचा व शासनाचा पैसा फुकट गेल्याची लोकांची भावना झाली आहे.त्यामुळे संबंधित खात्याने तातडीने या पुलाचे बांधकाम करणारे कॉन्ट्रॅक्टर व संबंधित अधिकारी यांनी जबाबदारी घेवून व हा पूल तातडीने पुर्ववत करावा अन्यथा संबंधित विभागाला जाग आणण्यासाठी निवेदन देऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
जिथं पुढे किंवा पाठीमागे नकाशातील रस्ता अस्तित्वात नसताना सदर साकव पुल हा मागासवर्गीय वस्तीला जोडणारा म्हणून दाखवला आहे. अशा ठिकाणी पूल बांधून ओढयालगतच्या जमिनी ओढ्याला आलेल्या पुरामुळे वाहून गेल्या आहेत. शासनाच्या निधीचा चुराडा बांधकाम करणारे ठेकेदार यांनी केला आहे. भाडळी बु।। च्या शिवेवरील ओढ्याचे पात्र बदलून गेले आहे आणि आता ओढ्याच्या लगतच्या शेतकर्यांच्या जमिनीस धोका निर्माण झाला आहे. नैसर्गिक आपत्तीवेळी स्थानिक प्रशासन व यंत्रणा यांनी वेळीच उपाय योजना केल्या नसल्याने व पुलाच्या पाईपला झाडं – झुडपं अडकली होती ती काढून पाण्याला वाट करून दिली असती तर हा पूल वाहूून गेला नसता अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
अमर्याद अनाधिकृत वाळू उपसामुळे आमराई पाझर तलाव, शेतकर्यांच्या जमिनी व साकव पूल यांचे नुकसान झाले आहे तरी प्रशासनाने वेळीच सदरचा साकव पुल बांधून द्यावा व संबंधित ठेकेदार व अधिकारी यांचेवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.