फलटण दि. 28 : येथील लायन्स व लायनेस क्लब यांच्यावतीने श्री माळजाई अंबाईदेवी देवस्थान ट्रस्ट फलटण नवरात्र उत्सव 2019 चे आयोजन करण्यात आले असून रविवार दि. 29 सप्टेंबर ते रविवार दि. 6 आॅक्टोंबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी प्रतिपदा असून सायंकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत विविध खेळ खेळणे, सोमवार दि. 30 सप्टेंबर रोजी द्वितिपदानिमित सायंकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत स्पर्धा व देवीची गाणी म्हणणे, मंगळवार दि. 1 आॅक्टोंबर तृतीयानिमित्त सायंकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत मॅचिंग वेशभूषा स्पर्धा लालरंग, बुधवार दि. 2 आॅक्टोंबर चतुर्थीनिमित्त सायंकाळी 4.30 ते 6.30 या वेळेत उखाणे स्पर्धा, गुरुवार दि. 3 आॅक्टोंबर रोजी पंचमीनिमित्त सायंकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत दांडिया सार, शुक्रवार दि. 4 आॅक्टोंबर रोजी षष्ठीनिमित्त सायंकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत महा भोंडला गाणी स्पर्धा, शनिवार दि. 5 आॅक्टोंबर रोजी सप्तमीनिमित्त सायंकाळी 5.30 ते 6.30 या वेळेत सरस्वती पूजन राखाडीरंग वेशभूषा आणि रविवार दि. 6 आॅक्टोंबर रोजी अष्टमीनिमित्त सकाळी 10 वाजता कुमारिका पूजन (वयोगट 10 वर्षे पुर्ण) करणे असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
नवरात्र उत्सव निमित्त माळजाई मंदिर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात महिलांनी सहभाग घ्यावा, महिला यांच्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धाचे बक्षिस वितरण त्यादिवशी केले जाणार असून सहभागी महिला यांना विशेष वेदांत टेक्स्टाईल साडी सवलत कूपन दिली जाणार आहेत तरी रसिक महिला यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
नवरात्र उत्सवनिमित्त दांडिया स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दांडिया ग्रुपने आपली नावे वेदांत टेक्स्टाईल महात्मा फुले शापिंग सेंटर फलटण येथे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
नवरात्र उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी होवून लाभ घ्यावा असे आवाहन लायन्स क्लबचे अध्यक्ष अर्जुन घाडगे, सचिव योगेश प्रभुणे व खजिनदार प्रमोद जगताप आणि लायनेस क्लब अध्यक्षा सौ. सुनिता कदम, सचिव सौ. निलम लोंढे पाटील व खजिनदार सौ. अर्चना बर्गे यांनी केले आहे.