फलटण दि. 27 : येथील श्रीराम लाकडी घाण्यावर काढलेले शुध्द व रसायनमुक्त आरोग्यवर्धक तेल श्रीराम रेसिड्यु फ्री शापीचा शुभारंभ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सोमवार दि 30 रोजी शाप नंबर 54 मार्केट यार्ड श्रीराम साखर कारखान्यासमोर फलटण येथे करण्यात आल्याची माहिती शिवराज नाईक-निंबाळकर यांनी दिली आहे.
श्रीराम रेसिड्यु फ्री शापीचा समारंभास श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर, श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, डॉ. माधवराव पोळ, दिलीपसिंह भोसले, सौ. निताताई नेवसे, नंदकुमार भोईटे व उद्योजक शाम दातार यांची उपस्थिती राहणार आहे.
फलटण शहर व परिसरातील नागरिक महिला व कुटुंबीय यांना आरोग्यवर्धक तेल उपलब्ध व्हावे या उद्देशाने श्रीराम रेसिड्यु फ्री शापी सुरू करण्यात आली आहे. लाकडी घाण्यावर तेल तयार करताना कोणत्याही प्रकारचे रसायन मिसळून तेल तयार केले जात नाही, त्यामुळे लाकडी घाण्यावरील तेल हे आरोग्यासाठी सर्वात चांगले तेल असल्याचे सौ. शुभांगी नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.
श्रीराम रेसिड्यु फ्री शापीमध्ये ग्राहकांना श्रीराम लाकडी घाण्यावर काढलेले शुध्द व रसायनमुक्त तेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शापीमध्ये शेंगदाणा, तीळ मोहरी खोबरेल जवस सैंधव करडई बदाम तेल आदी आमची उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याचबरोबर गुळ पावडर, गुळ ढेप, काकवी व हळद पावडर उपलब्ध करून दिली जात असल्याचे सांगण्यात आले.
श्रीराम रेसिड्यु फ्री शापीचा शुभारंभ समारंभास फलटण शहर व तालुक्यातील नागरिक महिला व ग्राहक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संभाजीराव नाईक-निंबाळकर, शिवराज नाईक-निंबाळकर व सौ. शुभांगी नाईक-निंबाळकर यांनी केले आहे.