फलटण दि. 25 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी आंतर महाविद्यालयीन कुस्ती, वजन उचलणे व शरीर सौष्ठव क्रिडा स्पर्धा 2019 चे आयोजन श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय फलटण येथील क्रिडांगण येथे करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. एस. टी. निंबाळकर यांनी दिली.
आंतर महाविद्यालयीन कुस्ती, वजन उचलणे व शरीर सौष्ठव क्रिडा स्पर्धाचे उदघाटन सकाळी 9.30 वाजता अजुन वीर पुरस्कार विजेते पै. काकासाहेब पवार व राष्ट्रकुल स्पर्धा सुवर्ण पदक विजेते पै. राहुल आवारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून समारंभाचे अध्यक्षस्थानी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे राहणार आहेत.
आंतर महाविद्यालयीन कुस्ती, वजन उचलणे व शरीर सौष्ठव क्रिडा स्पर्धाचे पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दि. 30 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता महाविद्यालय क्रिडांगण येथे फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात येणार असून या समारंभाचे अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग रामचरण चौहान हे राहणार आहेत. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे क्रिडा अधिकारी प्रा. डी. एम. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आंतर महाविद्यालयीन कुस्ती, वजन उचलणे व शरीर सौष्ठव क्रिडा स्पर्धा श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय समिती सदस्य व क्रिडा विभाग प्रमुख प्रा. पी. सी. सावंत व कृषी महाविद्यालय समिती सदस्य व क्रिडा विभाग प्रमुख प्रा. एन. बी. खुरंगे यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी केले आहे.