फलटण दि. 23 : युवा सज्ज हा झाला.. युवा महोत्सव आला हे ब्रीदवाक्य घेवून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 39 वा मध्यवर्ती युवा महोत्सवाचे आयोजन गुरुवार दि. 26 ते शनिवार दि. 28 सप्टेंबर पर्यंत मुधोजी महाविद्यालय फलटण येथे करण्यात आल्याची माहिती प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
39 व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे उदघाटन गुरुवार दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात येणार असून अध्यक्षस्थानी फलटण एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष माजी प्राचार्य विश्वासराव देशमुख हे राहणार आहेत. समारोप शनिवार दि. २८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून या दोन्ही समारंभास कोल्हापूर उच्च शिक्षण विभागीय सह संचालक डॉ. अजय साळी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विद्यार्थी विकास संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
39 व्या मध्यवर्ती युवा महोत्सवात सातारा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महाविद्यालये सहभागी होणार असून त्यामध्ये १५०० महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. यावेळी ३२ प्रकारचे कलाप्रकार सादरीकरण करण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्य़ातील देऊर येथे झालेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेले महाविद्यालयातील संघ या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे प्रभारी प्राचार्य डॉ गायकवाड यांनी सांगितले.
फलटण येथील ३९ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवात गुरुवार दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुरवात होणार असून सकाळी नोंदणी, उदघाटन, भारतीय समूहगीत, सुगमगायन व लोककला, लघुनाटीका, नकला एकपात्री अभिनय मुकनाट्य इंग्रजी मराठी हिंदी वक्तृत्व वादविवाद पथनाट्य कातरकाम व्यंगचित्रण मेहंदी व भिंत्तीचित्रण आदी कार्यक्रम होणार आहेत.
शुक्रवार दि. २७ सप्टेंबर रोजी पाश्चिमात्य समूहगीत लोकसंगीत वाद्यवृंद पाश्चिमात्य एकलगायन लोकनृत्य शास्त्रीय गायन सुरवाद्य तालवाद्य पाश्चिमात्य एकलवादन एकांकिका रांगोळी फोटोग्राफी स्थळचित्रण व मातीकाम असे कार्यक्रम होणार आहेत. तर शनिवार दि. २८ रोजी शास्त्रीय गायन प्रश्नमंजुषा व सांघिक रचनाकती असे कार्यक्रम होणार आहेत.
फलटण येथील ३९ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवात ३२ प्रकारचे कलाप्रकार सादरीकरण करण्यात आल्यानंतर प्रथम येणार्या तीन संघ यांना टाफी व बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे. सांघिक विभागातील अभिजीत कदम मेमोरियल चषक तर सर्वसाधारण विजेतेपदासाठी माजी कुलगुरू व आप्पासाहेब पवार चांदीचा फिरता चषक देण्यात येणार आहे. ३९ वा मध्यवर्ती युवा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विविध कमिट्यांची स्थापना करण्यात आल्याची माहिती प्रा. डाॅ. टी. एन शिंदे यांनी दिली आहे.
यावर्षीचा ३९ वा मध्यवर्ती युवा महोत्सव हा प्लॅस्टिक मुक्त अभियान युवक अशा स्वरूपाचा करण्याचे प्रयोजन असल्याचे शिवाजी विद्यापीठ यांनी ठरविले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी प्रा. एल. सी. वळेकर, प्रा. टी. पी. शिंदे, प्रा. डाॅ. सुधीर इंगळे, डॉ. अशोक शिंदे, प्रा. डाॅ. धवडे यांची उपस्थिती होती.
फलटण येथील ३९ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवात विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समिती, मुधोजी महाविद्यालय स्थानिक संयोजन समिती, विकास समिती, कलाविष्कार समिती, सव प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व सेवक वग यांनी केले आहे.