फलटण दि 22 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदराव पवार हे आज रविवार दि. 22 सप्टेंबर रोजी सातारा येथे कार्यक्रमास जात असताना आदर्की बुद्रुक ता. फलटण येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थ यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले.
सातारा येथील कार्यक्रमास शरदराव पवार हे बारामती येथून फलटण मागे साताराला जात असताना आदर्की बुद्रुक ता फलटण येथे शरदराव पवार यांचे पुष्पहार श्रीफळ शाल देवून ग्रामस्थ यांच्यावतीने स्वागत केले.
शरदराव पवार हे आदर्की बुद्रुक येथील एस. टी. स्टण्डसमोर आल्यावर फटाके वाजवून त्यांचे ग्रामस्थ यांनी स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी शरदराव पवार आगे बढो हम तुम्हारे साथ है. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी विजय पतसंस्थेचे चेअरमन विश्वासराव धुमाळ, पंढरीनाथ धुमाळ, महेंद्र धुमाळ, राजेंद्र धुमाळ, हणमंत पवार, धनंजय पिसाळ, विजयकुमार जाधव, धनंजय धुमाळ, प्रकाश शिंदे, संजय पोळ, शंकर धुमाळ, हणमंत काकडे, आण्णा पवार, कांतीलाल भोसले, किसन अनपट यांच्यासह युवा कार्यकर्ते व आदर्की बुद्रुक येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर समर्थक मोठया संख्येने उपस्थित होते.
शरदराव पवार यांचे वय 85 झाले असूनही आजही त्यांचे वागणे बोलणे हे युवा वर्गाला लाजवेल असेच त्यांचे राहणीमान असून राजकीय क्षेत्रातील त्यांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा असल्याची चर्चा उपस्थित ग्रामस्थ व युवा वर्गात सुरु होती.