साखर विक्री करून रक्कम कुठे गेली – मा.उच्च न्यायालयाचे माहिती सादर करण्याचे निर्देश

फलटण : फलटण येथील न्यू फलटण शुगर वर्क्स या साखर कारखान्याने सन २०१७-१८ ची एकूण ४८ कोटी रुपये ऊस देय रक्कम अद्यापही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केलेली नसल्याने फलटण येथील शेतकऱ्यांनी बॉम्बे हायकोर्टात रिट याचिका दाखल केलेली असता त्यावर आज सुनावणी झाली. गाळप वर्षात दोन लाख सत्तर हजार टन ऊसाचे गाळप झाले होते व जवळपास तीन लाख पोती साखर उत्पादन झाले ; उत्पादित झालेली साखर परस्पर कारखाना संचालकांनी विक्री केली मात्र त्याची रक्कम शेतकऱ्यांना न देता सदर रक्कम गेली कुठे असा प्रश्न याचिकाकर्त्यांच्या वतीने मा जस्टीस श्री रणजित मोरे व मा जस्टीस श्री एन जे जमादार यांचे खंडपिठा पुढे उपस्थित केला असता मा न्यायमूर्तींनी ऊसा पासून निर्मित साखर विक्री करून रक्कम कुठे गेली याची माहिती सरकारी वकिलांना सादर करण्यास निर्देश दिले. कारखान्याला शेतकऱ्यांच्या बरोबर इतरही देणेदारांची देणी बाकी असल्याने त्यातील एक देणेदार कॉसमॉस बँक यांनी एन सी एल टी कडे संस्थेच्या दिवाळखोरी बाबत याचिका दाखल केल्याने शेतकऱ्यांना एन सी एल टी द्वारा प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे रक्कम मिळणे बाबत हरकत याचिका दाखल करावी लागेल व या करता लवकरच कारखाना स्थळावर शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात येईल अशी माहिती याचिकाकर्ते श्री धनंजय महामुळकर यांनी दिली. शेतकऱ्यांच्या वतीने ऍड श्री विजय पाटील , ऍड श्री सिद्धार्थ करपे , ऍड श्री संदीप कोरेगावे व ऍड योगेश पांडे यांनी बाजू मांडली. मा साखर आयुक्तांनी कारखाना जप्तीचे आदेश देऊन वर्ष  झाले. जिल्हाधिकारी सातारा यांनी कॉसमॉस बँकेच्या याचिकेत शेतकऱ्यांच्या वतीने योग्य बाजू न मांडल्याने अठरा कोटीच्या वसुली पोटी दोन शे कोटी रुपये मालमत्ता असलेल्या कारखान्याच्या जप्ती प्रक्रियेला विनाकारण स्थगिती मिळाल्याने शेतकऱ्यांची रक्कम मिळण्यास अडचण निर्माण झाल्याचे ऍड योगेश पांडे यांनी सांगितले.यावेळी मुंबई हाईकोर्ट मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा युवा जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर तालुका अध्यक्ष नितीन यादव फलटण शहर अध्यक्ष सचिन खानविलकर उपस्थित होते
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!