विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही शाळा रयत शिक्षण संस्थेच्या शेजारी असणाऱ्या शाळेला अथवा श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या फलटण येथील हायस्कूलला जोडावी : माजी सरपंच सुरेशभाऊ शेंडे

फलटण  : महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी संचलित उत्तरेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विडणी ता. फलटण येथील हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही शाळा रयत शिक्षण संस्थेच्या शेजारी असणार्या शाळेला अथवा श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या फलटण येथील हायस्कूलला जोडावी अशी मागणी माजी सरपंच सुरेशभाऊ शेंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. 
उत्तरेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे पूर्णवेळ शिक्षक नसल्याने  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थी बचाव कृती समिती पालक व ग्रामस्थ यांच्यावतीने आज ( शुक्रवार दि.२०) रोजी शाळा बंद व धरणे आंदोलन करण्यात आले होते याबाबत विद्यार्थी याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शेंडे यांनी वरील मागणी केली आहे. 
विडणी येथील महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी 
संचलित उत्तरेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची कार्यकारणी अस्तित्वात नसून संस्थेचा कारभार बेकायदेशीरपणे सुरु आहे. संस्थेचे सचिव यांनी बेकायदेशीर तडजोडी करुन विषय शिक्षक यांची नोकरभरती केली असुन अधिकार नसताना सन 2014 मध्ये बनावट प्रस्ताव पाठविण्यात आले असून यामध्ये शासकीय अधिकारी सहभागी असल्याचे शेंडे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. 
 संस्थेचे सचिव यांनी सन 2012 साली शिक्षक भरती करताना कोणतेही नियम पाळले नाहीत. पवित्र पोटलला उत्तरेश्वर विद्यालयाची नोंद न केल्याने शासनाकडून या वर्षात शिक्षक मिळणे कठीण आहे. याला सचिव पूर्णपणे जबाबदार आहेत. संस्थेच्या कार्यकारिणीचा पीटीआर तयार केल्याशिवाय भविष्यात हायस्कूलला नोकरभरती करता येणार नसुन शाळेला आता शिक्षक मिळणे कठीण असल्याचे शेंडे यांनी पत्रकात म्हटले आहे. 
उत्तरेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विडणी ता. फलटण येथील हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या शेजारी असणार्या शाळेला अथवा श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या फलटण येथील हायस्कूलला जोडणे हाच पर्याय असून त्या संस्थेमार्फत पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल अशी मागणी आपण लवकरच सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे सांगून शाळा बंद व धरणे आंदोलनास सर्वस्वी सचिव जबाबदार असल्याचे माजी सरपंच सुरेशभाऊ शेंडे यांनी 
पत्रकात नमूद केले आहे. 
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणार्या सचिव व विद्यालयात काम करणारे काही अनधिकृत शिक्षक व पालकांचा पाठींबा नसताना शाळा बंद धरणे आंदोलन करून शाळा बंद पाडणार्‍या व राजकीय हेतूने आंदोलन करणारे व्यक्ती यांच्यावर प्रशासनाने कडक कारवाई करावी असे मत विद्यार्थी पालक नितीन पवार यांनी पत्रकाद्वारे केली आहे. 
विडणी येथील महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी 
संचलित उत्तरेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची कार्यकारणी अस्तित्वात नसून नोकरभरती करण्याचा अधिकार नसून शासनाच्या धोरणानुसार सन 2012 नंतर पवित्र पोटल प्रणाली नुसार शिक्षक नेमणे आवश्यक होते. विद्यार्थी यांची भावीपिढी  वाचविण्यासाठी प्रशासन यांनी कडक भूमिका घ्यावी अशी मागणी उत्तरेश्वर दूध डेअरीचे माजी चेअरमन माधवराव अभंग यांनी पत्रकाद्वारे केली आहे. 
महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी संचलित उत्तरेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची कार्यकारणी अस्तित्वात नसून नोकरभरती करण्याचा अधिकार नसून केलेली शिक्षक भरती अनधिकृतच असल्याचे सांगून अद्ययावत पीटीआर तयार होईपय कोणताही निर्णय न घेता शाळेवर प्रशासक नेमावा अशी मागणी माजी सरपंच चंद्रकांत नाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!