फलटण : केंद्र सरकार पेट्रोलियम व नैसर्गिक गस मंत्रालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेत येथील महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
इयत्ता ५ वी ते ७ वी मधील ज्युनिअर गटात शाळा स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत आर्यन अनिल पवार, तनिष्का राजेंद्र तारळकर, तर निबंध स्पर्धेत प्राची शांतिलाल काकडे, ओंकार रामदास शिंदे यांनी प्रथम, व्दितीय क्रमांक प्राप्त केले. 120 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. .
फलटण येथील हिंदुस्थान पेट्रोलियमचे एच. डी. लाटकर गॅस एजन्सीचे प्रमुख अॅड.मिलींद लाटकर यांच्या हस्ते विजेत्यां विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सौ.विजया भोसले, सौ.हेमलता गुंजवटे, सौ.
शमीम शेख, सुनिल डावखर या मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर,
लाटकर गॅसचे व्यवस्थापक सुभाष जाधव व
एजन्सीचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शेवटी किशोर पवार यांनी आभार मानले.
संस्थेचे अध्यक्ष सुभाषराव शिंदे, कार्यवाह रविंद्र बेडकिहाळ, शाळा समितीचे अध्यक्ष रविंद्र बर्गे व अन्य पदाधिकारी, मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.