फलटण दि. 20 : कोळकी ता. फलटण येथील श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्षपदी साप्ताहिक लोहसंस्कार चे संपादक हनुमंतराव चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचा 8 वा वर्धापनदिन कोळकी येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी 16 सदस्य असलेली कार्यकारणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी हनुमंतराव चव्हाण, उपाध्यक्ष अरविंद शिंदे, सचिव पदी माधव काढणे यांचा यामध्ये समावेश आहे.
हनुमंतराव चव्हाण यांचे वास्तव्य शारदानगर कोळकी ता. फलटण येथे असून तिरकवाडी ता. फलटण येथील जयभवानी शिक्षण संस्थेमध्ये तिरकवाडी हायस्कूल येथे इंग्रजी विषयाचे अध्यापनाचे काम गेली 30 वर्षे ते करीत होते. तेथूनच ते पर्यवेक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. गेली अनेक वर्षे हनुमंतराव चव्हाण पत्रकार म्हणून काम करीत असून ते साप्ताहिक लोहसंस्कार चे संपादक म्हणून काम करीत असून लोहार समाजातील विविध प्रश्नांवर काम करत आहेत.
हनुमंतराव चव्हाण यांची श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व विविध पदाधिकारी यांचे निवडीबद्दल विविध स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.