पुढच्या दोन आठवड्यात कास पठारावर नैसर्गिक फुलांची विविधरंगी उधळण

सातारा: जागतिक हेरिटेजचा दर्जा असलेल्या कास पठारावर विविधरंगी फुलांचा मोसम सुरु असून अजून दोन आठवड्यांनी ह्या फुलांचा हंगाम आणखी विहंगम नैसर्गिक रुप धारण करणार असून पर्यटक फुले पाहण्यासाठी गर्दी करीत असल्याचे चित्र सातारा तालुक्यातील कास पठार येथे पहावयास मिळत आहे. त्यानिमित्त…… 
आता सप्टेंबर महिना सुरू असून या आठवड्यात आणि पुढच्या दोन आठवड्यात कास पठारावर नैसर्गिक फुलांची विविधरंगी उधळण पर्यटक यांना फुलांच्या रंगाचा आसमंत दिपवून टाकणारा उत्सव कास पठार सातारा येथे सुरु झाला आहे. नजर जाईल तिथंपर्यंत फुलं अगदी क्षिताजाला टेकून आभाळालाच लटकली आहेत की काय असं भासणार हे दृष्य येथे सध्या पहावयास मिळत आहे. मनाचं फुलपाखरू व्हावं आणि फुलांच्या ताटव्यावर विहरत राहावं असं तल्लीन करणारं मंत्ररलेलं वातावरण व धुक्याच्या दुलई अच्छादलेला आसमंत व कल्पनेतला हा स्वर्ग पाहण्यासाठी कास पठार येथे गेलेवर दिसून येते. 
डोळ्याला सुखावणार, मनाला रिझवणारं हे नैसर्गिक फुलांचे दृष्य कास पठारची खरी ओळख आता जगाच्या नकाशावर आली आहे. जैवविविधता म्हणून जे या सृष्टीच्या असण्याला आकार देते. त्याची श्रीमंती मोजण्याचे जे प्यारामीटर आहेत ते इतर ठिकाणी तुम्हाला पाहावयास मिळणार नाहीत. दुर्लभ आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पेसीज कास पठार येथे  पहावयास मिळतात म्हणून हे कास पठार जगातल्या महत्वाच्या जैवाविविधता असलेल्या ठिकाणांपैकी एक असल्यामुळे याला जागतिक हेरिटेजचा दर्जा प्राप्त झाला आहे. 
कास पठार येथे नैसर्गिक रंगाची उधळण करणारी वायतुरा ही स्पेसीज सातारीतूरा म्हणूनही ओळखली जाते. कंदाला जाड लांब पाने येतात त्यातून एका पांढऱ्या फुलांचा तुरा येतो. कळलावी फुलाचे नाव ऐकूनच आपण उडतो कारण  ही जहाल विषारी स्पेसीज असून या फुलाला वर लाल आणि खाली पिवळं फुलं लागलेलं असतात. दिसायला खूप मनमोहक फुल  असून  सीतेचे आसवे ही स्पेसीज निळ्या रंगाची असून मध्ये पांढरट कलर असतो ती सप्टेंबर मध्येच दिसतात हे येथील खास आकर्षण आहे. रावणाने सीतेचे हरण केले त्यावेळी तिचे आसवं फुलावर पडली म्हणून तेवढा भाग पांढरा झाला बाकी फुलं निळ राहिलं अशी दंतकथा लोकांनी या फुलांशी जोडली म्हणून यांचे नाव सीतेची आसवं असे पडले आहे. ही स्पेसीज आपल्या अंगभूत गंधानी कीटकांना जवळ बोलावते आणि त्याच्या बुडाला चिकट गाठ असते ती या कीटकांना खेचून घेते. ह्या आणि अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण स्पेसीज जगात फक्त भारत देशातील सातारा येथील कास पठार येथेच पहावयास मिळतात.
 या स्पेसीजच्या प्रत्येक सवयीचे निरीक्षण नोंदविणारे वनपाल श्रीरंग शिंदे हे या 1200 हेक्टर एवढ्या विस्तीर्ण कास पठारावर पसरलेल्या फुलांचे चालते बोलते कोष आहेत.  कास पठारावर फुलांच्या रंगाची उधळण तर असतेच परंतु  अनेक चमत्कारिक स्पेसीजचा जन्म या कास पठारावर दोन महिन्याच्या कालावधीत  होतो ते पाहणे म्हणजे एक अलौकिक आनंदाची अनुभूती असते. पर्यटक यांनी फोटो काढून फक्त सोशल मीडियावर अपलोड कारण्याएवढं सीमित हे कास पठारावरील फुलांचे विश्व् नाही हे सांगण्यासाठी हा लेख प्रपंच करण्यात आला आहे. 
सातारा जिल्ह्यातील नैसर्गिक फुलांचा जिवंतपणा व जागतिक पातळीवर नावाजलेल्या कास पठाराला आयुष्यात एकदा तरी भेट देवून निसर्ग करीत असलेली रंगाची उधळण पाहणे गरजेचे असून त्यासाठी सातारा येथील कास पठार आता पर्यटक यांना पाहण्यासाठी खुले झाले असून विविध राज्य देशातील पर्यटक भेट देत आहेत. तरी आपणही कास पठारावरील नैसर्गिक फुलांची उधळण पाहणेसाठी आवर्जुन यावे. कास पठार येथे भेट देणेसाठी आनलाईन बुकींग व्यवस्था करण्यात आली आहे. तरी पर्यटक यांनी आनलाईन बुकींग करुन आपले सर्वाचे फुलांचे जागतिक माहेरघर कास पठार पहावे असे आवाहन कास पठार कार्यकारी समिती व वनविभाग सातारा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!