फलटण : फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या विविध रस्ते व अन्य कामांसाठी सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने दि. ६ सप्टेंबरच्या शासन निर्णयाप्रमाणे फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघातील ३४ कामांसाठी १ कोटी रुपयांचा निधी ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराज), सभापती, विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य, आ.दिपकराव चव्हाण साहेब यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाल्याची माहिती सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी दिली आहे.
फलटण व कोरेगाव तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील ३४ कामांमध्ये आळजापूर येथे शिंदेवाडा ते ज्ञानदेव गुरव रस्ता करणे, आदर्की बुद्रुक येथे शिवाजीराव जाधव ते गणपतराव धुमाळ यांचा गोठा रस्ता करणे, आदर्की खुर्द येथे निष्णाईदेवी मंदिर ते मागासवर्गीय वस्ती रस्ता करणे, ढवळेवाडी (आसू) येथे हनुमान मंदिर ते प्रा.शाळा रस्ता करणे, आसू येथे अंतर्गत रस्ता करणे, पाटणेवाडी येेथे शंकर बर्गे वस्तीजवळ सीडीवर्क बांधणे, पाटणेवाडी येथे खलाटेवस्ती रस्ता करणे, सोनवडी बुद्रुक येथे शिंगणापूर रस्ता ते भांडवलकर वस्ती रस्ता करणे, वेळोशी येथे ग्रामपंचायत इमारत सुधारणा करणे व पेव्हींग ब्लॉक बसविणे, तिरकवाडी येथे हायस्कुल पोहोच रस्ता डांबरीकरण करणे, मालोजीनगर कोळकी येथे पाईप गटर करणे, कुरवली बुद्रुक येथे मसुगडेवस्ती ते गावडेवस्ती रस्ता करणे, जिंती येथे बाळासाहेब नगर ते नाना सावंत ते रमेश चौगुले घर रस्ता करणे, शिंदेनगर येेथे पवारवस्ती रस्ता ते विलास सुतार घर रस्ता करणे, साखरवाडी येथे समीर भोसलेवस्ती रस्ता करणे, जाधवनगर येेथे उपळवे अंतर्गत रस्ता करणे, जाधववाडी येथे भुजबळ घर ते अशोक काळे घर रस्ता करणे, दहिगाव ता.कोरेगाव येथे लक्ष्मीबाई मंदिर ते स्मशानभूमी रस्ता करणे, नांदवळ येथे प्रकाश चव्हाण घर ते विकास सोसायटी रस्ता करणे, निरगुडी येथे अंतर्गत रस्ता करणे, घिगेवाडी स्वागत कमान ते नंदकुमार घिगे घर रस्ता करणे, आसनगाव महेश किसन शिंदे घर ते पाटलाचा वाडा रस्ता करणे, गिरवी येेेथे अंतर्गत रस्ता करणे, सर्कलवाडी येथे अंतर्गत रस्ता करणे, फरांदवाडी येथे कदमवस्ती ते सुर्यवंशीवस्ती रस्ता करणे, सोनके येथे स्मशानभूमी सुधारणा करणे, करंजखोप येथे सिमेंट रस्ता करणे, रणदुल्लाबाद येथे यशवंत आनंदराव जगताप घर ते किरण नामदेव जगताप घर रस्ता करणे, पिंपोडे येथे तडवळे रोड ते मनोहर पुजारी शेड रस्ता करणे, फरांदवाडी येथे सुर्यवंशी वस्ती ते निंबाळकर वस्ती रस्ता करणे, पाडेगाव येथे संजयनगर ते येळेवस्ती रस्ता करणे, फरांदवाडी येथे दूधसंघ ते कदमवस्ती रस्ता करणे, पाडेगाव येथे जिल्हा परिषद प्रा.शाळा ते कुंभारघर रस्ता करणे, पिंप्रद येथे पवारवाडी ते ह.भ.प.बंडामहाराज कराडकर मठ रस्ता करणे.
तालुक्यातील विविध कामांसाठी सुमारे १ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्याची टेंडर्स काढून तातडीने रस्त्यांची व अन्य कामे हाती घेण्यात येणार असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी सांगितले.