फलटण, दि. 15 : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित क्रृषी महाविद्यालय फलटण येथील क्रृषिकन्या यांनी ग्रामीण क्रृषी कार्यक्रमांतर्गत खुंटे ता. फलटण येथील गावातील शेतकरी महिला व ग्रामस्थ यांना झाडे लावताना खड्डा घेणे व माती भरणे व घ्यावयाची काळजी यांचे प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले.
ग्रामीण कृषि कार्यानुभव अंतर्गत क्रृषी महाविद्यालय फलटण येथील क्रृषिकन्या खुंटे गावामध्ये कार्यरत असून येथील शेतकरी महिला व ग्रामस्थ यांना शेतीबद्दल विविध प्रकारचे मार्गदर्शन करून आधुनिक शेती कशी करावी याबाबत मार्गदर्शन करीत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून खुंटे येथील शेतकरी महिला व ग्रामस्थ यांना झाडे लावताना आधुनिक पद्धतीने झाडे कशी लावावीत खड्डा घेणे व तो भरणे याचे प्रशिक्षण दिले. झाडे लावल्यावर घ्यावयाची काळजी आणि औषध व खतांचे प्रमाण पाणी व्यवस्थापन याबाबत विद्यार्थीनी यांनी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमास खुंटे गावातील शेतकरी व ग्रामस्थ यांच्यासह महिला व कषिकन्या विद्यार्थीनी उपस्थित होत्या.