गोखळी प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्पर्धा परिक्षेसाठी सुरु केले मार्गदर्शन केंद्र उपयुक्त : मनोज गावडे

फलटण दि. 15 : आजच्या स्पर्धेच्या युगात युवकांनी सामाजिक उपक्रमाद्वारे स्कॉलरशिप व नवोदय विद्यालयसारख्या स्पर्धा परिक्षांसाठी उपयुक्त मार्गदर्शन केंद्र सुरू करुन देशाचे भवितव्य घडविण्यासाठी गोखळी प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी सरपंच व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोजतात्या गावडे यांनी केले. 
गोखळी ता फलटण येथील गोखळी प्रतिष्ठानच्या शाखेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. उषादेवी गावडे, विश्वासराव गावडे, बजरंग ( नाना ) गावडे,  प्राचार्य गिरीधर गावडे नवनाथ गावडे डॉ शिवाजी गावडे, महेश जगताप काळेश्वर ढोबळे यांची उपस्थिती होती. 
गोखळी सारख्या ग्रामीण भागातील यूवक यांनी एकत्रित येवून गोखळी प्रतिष्ठानची स्थापना केली असून ग्रामीण युवकांना विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी उचलेले पाउल योग्य असुन प्रतिष्ठानला आवश्यक ते सहकार्य करु अशी ग्वाही बजरंग गावडे (सवई) यांनी दिली. 
ध्यास समाज परिवर्तनाचा, ध्यास समाजसेवेचा हे ब्रीद घेऊन अभियंता दिनाचे औचित्य साधुन गोखळी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावच्या सामाजिक , शैक्षणिक , पर्यावरण , आरोग्य व  विविध विधायक उपक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य करण्यासाठी प्रतिष्ठान प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. 
प्रास्ताविक कुणाल गावडे यांनी केले. शेवटी नवनाथ गावडे यांनी मानले. 
कार्यक्रमास ग्रामपंचायतचे आजी -माजी सदस्य , विविध संघटनांचे पदाधिकारी , प्रतिष्ठानचे सव सदस्य यासह बहुसंख्य युवक व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी परीश्रम घेतले .
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!