फलटण दि. 15 : फलटण – लोणंद रोडवर विठ्ठलवाडी फाटा (तरडगांव) ता. फलटण येथे रविवार दि. 15 रोजी इनोव्हा कार व दुचाकी मोटार सायकल यांचा अपघात होवून एक जण ठार झाला आहे.
याबाबत लोणंद पोलीस यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवार दि 15 रोजी रोजी दुपारी 3. 45 वाजण्याच्या सुमारास विठ्ठलवाडी फाटा (तरडगांव) ता. फलटण गावच्या हद्दीत फलटण – लोणंदरोड वर इनोव्हा कार क्रमांक ( एम एच 04 जेयु 0007) व हिरो होंडा मोटर सायकल क्रमांक (एम एच 13 एम 9567) यांचा अपघात झाला आहे. विठ्ठलवाडी फाटा येथे मोटार सायकलला पाठीमागून इनोव्हा कारने धडक दिल्याने हा अपघात झाला. मोटार सायकलवरील अतुल निशिकांत शिंदे (वय 50 वर्ष रा. वेळापूर ता. माळशिरस जि. सोलापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर रामचंद्र निवृत्ती बनकर (वय 70 वर्ष रा. वेळापूर ता. माळशिरस जि. सोलापूर) हे ठार झाले आहेत. याबाबत लोणंद पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हवालदार दिघे करीत आहेत.