फलटण दि. 15 : फलटण नगरपालिकेच्या नगरसेविका तथा स्वयंसिध्दा महिला संस्था समुहाच्या अध्यक्षा अॅड.सौ मधुबाला दिलीपसिंह भोसले यांना उत्कृष्ट नगरसेविका म्हणुन काम केल्याबद्दल सलग दुसऱ्या वर्षी मी पदवीधर पुरस्कार प्राप्त झाला आहे.
सातारा येथे सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील व सारंग पाटील यांच्या हस्ते अॅड.सौ मधुबाला दिलीपसिंह भोसले यांना मी पदवीधर पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
नगरपालिका कार्यक्षेत्रात उत्कृष्ठ योगदान देणाऱ्या व लोककल्याणाचे कार्य करणाऱ्या नगरसेवकांचा दरवर्षी मी पदवीधर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो.
अॅड.सौ मधुबाला दिलीपसिंह भोसले या फलटण नगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून कार्यरत असून गेली दोन पंचवार्षिक नगरसेविका पदावर काम करीत आहेत. फलटण शहरातील विविध विकासकामे सामाजिक सहकार व शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्या नेहमी आघाडीवर राहून काम करीत आहेत विशेषत: फलटण शहर व परिसरातील महिला यांच्यासाठी विविध उपक्रम राबवित आहेत.
मी पदवीधर पुरस्कार मिळाल्याबद्दल अॅड.सौ मधुबाला दिलीपसिंह भोसले यांचे विधान परिषद सभापती ना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आ. दिपक चव्हाण नगराध्यक्षा सौ. निताताई नेवसे, श्री सदगुरु संस्था समुहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, फलटण नगरपालिका सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्यासह सामाजिक साहित्य सांंंस्कृतिक सहकार राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्वानी व नागरीक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.