फलटण – सातारा रोडवरील बाणगंगा पुल येथील चौकाचे शुरवीर जिवाजी महाले चौक असे नामकरण

फलटण  दि. 15 :  येथील फलटण नगर परिषदेच्यावतीने बाणगंगा पुल फलटण सातारा रोडवर असणार्‍या चौकाला शुरवीर जिवाजी महाले चौक असे नामकरण सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा  सौ. निताताई  नेवसे, मुख्यधिकारी प्रसाद काटकर, जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, आरोग्य सभापती अजय माळवे, महिला बालकल्याण समिती सभापती सुवर्णा खानविलकर , बांधकाम सभापती ॲड सौ. मधुबाला भोसले, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 फलटण शहरातील कोणत्याही चौकास शुरवीर जिवाजी महाले असे नाव देण्याची मागणी नाभीक समाज यांच्यावतीने करण्यात आली होती त्या मागणीचा विचार करुन फलटण सातारा रोड येथील बाणगंगा पुलाशेजारील चौकास शुरवीर जिवाजी महाले यांचे नाव देणेचा ठराव श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी नुकत्याच झालेल्या फलटण नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडला होता. 
विधानसभा निवडणुक आचारसंहीतेच्या प्राश्वभुमीवर हा समारंभ घेण्यात आला. यावेळी नाभिक महामंङळाचे राज्य उपाध्यक्ष बापूराव काशिद ,  हभप विठ्ठल महाराज गायकवाड ,  पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शंकरराव मर्दाने, माजी कार्याध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
प्रास्तविक आरोग्य सभापती अजय माळवे यांनी केले. शेवटी जिल्हा कार्याध्यक्ष अंबादास दळवी यांनी  आभार मानले.  
कार्यक्रमास पाणीपुरवठा सभापती सौ. ज्योस्ना शिरतोडे, शिक्षण सभापती असिफ मेटकरी ,नगरसेविका सौ. वैशाली चोरमले, सौ. प्रगती कापसे, दिपाली निंबाळकर, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, फलटण शहराध्यक्ष आनंदराव राऊत , जिल्हाकार्याध्यक्ष अंबादास दळवी, माजी शहराध्यक्ष विकास कर्वे , माजी कार्याध्यक्ष बाळासाहेब काशीद, जिल्हा संघटक तुकाराम घाङगे ,  जिवा/ शिवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पवार ,  बंटी गायकवाड ,अमरसिंह खानविलकर , माजी नगरसेवक अभिजित भोसले यांच्यासह शहर व तालुक्यातील नाभिक समाज बांधव व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!