फलटण दि. १४ : भाजपाचे माढा येथील खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी दिल्ली येथे केंद्रिय गृह विभाग उच्चाधिकार चौकशी समिती सदस्यपदी निवड केली आहे.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची काही दिवसांपूर्वी सोलापूर पश्चिम विभाग रेल्वे मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. आता केंद्र शासन अंतर्गत गृह विभाग उच्चधिकार चौकशी समिती सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. खा. रणजितसिंह यांना गृह व रेल्वे अशा दोन खात्यामध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
भारत देशाच्या केंद्रीय गृह विभाग उच्चाधिकार चौकशी समिती सदस्यपदी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची निवड झाल्याने देशातील राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्यातील संरक्षण विषयातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असून या समितीमध्ये खा. रणजितसिंह यांना काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी यांची चौकशी केंद्र सरकार अंतर्गत सर्व सुरक्षा एजन्सी यांची कामे समितीच्या माध्यमातून केली जात असतात. केंद्रीय गह विभाग उच्चाधिकार चौकशी समिती व सोलापूर पश्चिम विभाग रेल्वे मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना रेल्वे व गृह या दोन्ही समितीवर काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवडीबद्दल केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शहा, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, श्री. छ. उदयनराजे भोसले, जयकुमार गोरे यांच्यासह भाजपाचे आमदार व खासदार आणि सोलापूर व सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी व मान्यवर यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.