काव्या डिझायनर्स बुटीक आयोजीत भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धा संपन्न

फलटण : फलटण आयोजीत काव्या डिझायनर्स बुटीक भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धेचा निकाल शनिवार दि: १४ सप्टेंबर २०१९ रोजी, नवलबाई मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.   
     या कार्यक्रम प्रसंगी विजेत्यांना श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर  यांच्या शुभहस्ते आकर्षक बक्षीसे देण्यात आली.सदर कार्यक्रम प्रसंगी सौ.सुवर्णा खानविलकर(नगरसेविका फ न प),सौ. जोत्सना अनिल शिरतोडे (नगरसेविका फ न प), श्रीमती.स्वाती आशिष अहिवळे (मा. उपनगराध्यक्ष फ न प ), सौ. प्रतिभा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते 
     याकार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण, खास महिलांच्या मनोरंजनासाठी सौ. कल्पना देशपांडे ( पुणे) यांचे हास्यविनोदी नाटक ” असा नवरा ” हे नाटक देखील आयोजित केले होते.
    सदर कार्यक्रम नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ रोड,फलटण येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन सौ.सुपर्णा सनी अहिवळे यानी केले होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!