फलटण दि. १२ : महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती ना. श्रीमंत रामराजे, कषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे व सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यातील विविध गावामध्ये विकासकामांचा डोंगर उभा राहिला आहे. आसू गावही नेहमीच विकासकामांमध्ये अग्रेसर राहिले असून येथील जनतेनेही आपली बांधिलकी जपली असून येथून पुढेही जपतील अशी अपेक्षा फलटण पंचायत समितीचे उपसभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी व्यक्त केली.
आसू ता. फलटण येथील विविध फंडातील विकास कामांचे भूमीपूजन फलटण पंचायत समितीचे उपसभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच महादेवराव सकुंडे, उपसरपंच नितीन गोडसे , ग्रामपंचायत सदस्य अच्युत शिरतोडे, सागर सस्ते, राजेंद्र गोफणे, जीवन पवार , धनराज घोरपडे , मधुकर फुले, धनंजय बोडरे, ज्ञानदेव भोसले, सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक प्रमोद झांबरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवाजीराव माने पाटील, एम. के. कदम, स्वामी साबळे, आसू नं. 1 सोसायटीचे चेअरमन मारूती शेडगे, आप्पा फाळके, राहुल पवार, विशालसिंह माने पाटील, रामदास माने , मोहन फुले, बाळासाहेब साबळे, हरिचंद्र सपकळ, शंकरराव बरळ, आनंदराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपले वडील कै. श्रीमंत दादाराजे खर्डेकर यांच्यावर आसू गाव फलटण तालुका व सातारा जिल्ह्यास विविध जिल्ह्यातील जनतेने प्रेम केले. वडील यांनीही शैक्षणिक राजकीय सहकार क्षेत्रातील कोणत्याही कामामध्ये दुजाभाव न करता सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील राहिले. आपणही त्यांच्या पश्चात जनतेशी असणारी नाळ तुटू देणार नसल्याचे श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी सांगितले.
प्रारंभी फलटण पंचायत समितीचे उपसभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांच्यासह आसू गावातील विविध मान्यवर यांच्या हस्ते गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
आसू ता फलटण येथील गाव परिसरात एकूण ६१ लाख १० हजार रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आलेली विविध विकासकामे पुढीलप्रमाणे – जिल्हा वार्षिक योजनेतून आसू – कुरबावी रस्ता करणे 33 लाख रुपये, आमदार फंडातून लक्ष्मीदेवी मंदिरासमोरील सभामंडप बांधणे 5 लाख 30 हजार रुपये, नागरी सुविधा योजनेतून श्री काळभैरवनाथ मंदिर ते निंबाळकर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 4 लाख 30 हजार रुपये, सातारा जिल्हा परिषद फंडातून बरळवस्ती येथे 10 हजार लिटर पाण्याची क्षमता असलेली टाकी बांधणे 11 लाख रुपये, शासकीय योजनेतून सपकळवस्ती रस्ता खडीकरण करणे 2 लाख 50 हजार रुपये व बोंगाणेवस्ती ते घोरपडेवस्ती रस्ता खडीकरण करणे 2 लाख 50 हजार रुपये आणि फलटण पंचायत समिती सेस फंडमधून आसू गावातील भवानी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी शेजारी गटर बांधणे करणे 2 लाख 50 हजार रुपये. लवकरच ही सव कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास आसु ता. फलटण येथील ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
शेवटी प्रमोद झांबरे यांनी आभार मानले.