फलटण, दि. 10 : महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपक चव्हाण व आपण स्वत: मार्च आणि जून २०१९ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याशी सतत संपर्क करुन, लेखी मागणी नोंदवून, केलेल्या सततच्या पाठपुराव्याद्वारे पुरवणी अर्थसंकल्प जून 2019 मधील कामाबाबत केलेल्या प्रयत्नामुळे फलटण तालुक्यात 23.100 कि.मी. रस्त्यांची 15 कोटी 19 लाख 36 हजार रुपयांची कामे मंजूर झाली असल्याची माहिती सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
या मंजूर कामापैकी 20.98 कि.मी. लांबीच्या 8 रस्त्यांची दर्जोन्नती संशोधन व विकास अंतर्गत आणि 2.100 कि.मी. लांबीच्या 1 रस्त्यांची दर्जोन्नती मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात येणार आहे. त्यासाठी अनुक्रमे 13 कोटी 83 लाख 90 हजार आणि 1 कोटी 35 लाख 46 हजार रुपये असे एकुण 15 कोटी 19 लाख 36 हजार रुपये मंजूर असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर कामांमध्ये- प्रमुख जिल्हा मार्ग क्र 67 ते सावंतवाडी रस्ता 1.700 कि.मी. 1 कोटी 19 लाख 58 हजार आणि 5 वर्षे नियमित देखभाल दुरुस्तीसाठी 6 लाख 42 हजार रुपये, सस्तेवाडी ते दातेवस्ती या 2.030 कि.मी. रस्त्यासाठी 1 कोटी 44 लाख 87 हजार आणि 5 वर्षे नियमित देखभाल दुरुस्तीसाठी 7 लाख 93 हजार रुपये, एमएसएच 15 ते भिलकटी रस्ता या 3 कि.मी. रस्त्यासाठी 2 कोटी 20 लाख 63 हजार रुपये आणि 5 वर्षे नियमित देखभाल दुरुस्ती साठी 13 लाख 82 हजार रुपये, प्रजिमा 67 ते विंचुर्णी रस्ता 5.050 कि.मी. रस्त्यासाठी 3 कोटी 17 लाख 90 हजार आणि 5 वर्षे नियमित देखभाल दुरुस्तीसाठी 16 लाख 31 हजार रुपये, फलटण गिरवी रस्ता ते सासकल चांगणवस्ती रस्ता 1.700 कि.मी. रस्त्यासाठी 1 कोटी 19 लाख 43 हजार रुपये आणि 5 वर्षे नियमित देखभाल दुरुस्तीसाठी 6 लाख 75 हजार रुपये, राज्य मार्ग 149 ते तावडीरस्ता या 4 कि.मी. रस्त्यासाठी 2 कोटी 20 लाख 69 हजार रुपये आणि 5 वर्षे नियमित देखभाल दुरुस्तीसाठी 13 लाख 14 हजार रुपये, वाठार ते जुने वाठार या 1.900 कि.मी.रस्त्यासाठी 1 कोटी 37 लाख 94 हजार रुपये आणि 5 वर्षे नियमित देखभाल दुरुस्तीसाठी 8 लाख 7 हजार रुपये, एमआरएल 13 ते पवारवस्ती, मुंजवडी रस्ता 1.600 कि.मी. रस्त्यासाठी 1 कोटी 2 लाख 86 हजार रुपये आणि 5 वर्ष नियमित देखभाल दुरुस्तीसाठी 5 लाख 53 हजार रुपये, एमएसएच 15 ते पवारवस्ती रस्ता (भवानी नगर, राजुरी) या 2.100 कि.मी. रस्त्यासाठी 1 कोटी 35 लाख 46 हजार रुपये आणि 5 वर्षे नियमित देखभाल दुरुस्तीसाठी 8 लाख 3 हजार रुपये मंजूर असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे. राजे ग्रुप, फलटण.