फलटण दि. १० : श्री गणेशोत्सव उत्सवात गणेश मुर्तींची प्रतिष्ठापना ते गणेश विसर्जन कालावधीपर्यंत फलटण शहरात यापूर्वी कोणताही अनुचित प्रकार घडला नसून गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था याचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे सांगून गणेशोत्सव काळात शांतता राखण्याची परंपरा असुन याहीवर्षी गणेश मंडळासह नागरीकांनी हीच परंपरा कायम ठेवावी. गणेश विसर्जना वेळी डॉल्बी ‘ डी.जे. चा आनंद कोर्ट आदेशाप्रमाणे घेता येणार नसुन गणेश मंडळांनी पारंपारीक वाद्याला प्राधान्य देवुन आनंद साजरा करावा असे आवाहन सातारा जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी केले आहे
श्री गणेश मुर्ती विसर्जन पार्श्वभूमीवर फलटण येथील पोलीस यांच्यावतीने गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात बोलविण्यात आली होती. यावेळी सातपुते बोलत होत्या. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक प्रताप पोमण , ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांचेसह अन्य पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
गणेश मंडळानी विसर्जनाच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासंदर्भात केलेल्या सुचना याबाबत आपण व आपले पोलीस सहकारी सुचनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणार असुन शहरातील वहातुक ‘ नियोजन , पोलिस बंदोबस्त , रस्त्यावरील खड्डे , अन्य पायाभुत सुविधा , विसर्जन ठिकाणची लाईट व्यवस्था, मिरवणुक मार्गावरील व्यवस्था , गणेशभक्तांची गर्दीबाबतचे नियोजन , यासह अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचना संबधित यंत्रणांना करण्यात आल्या असल्याचे तेजस्विनी सातपुते यांनी सांगितले.
गणेश मंडळाना काही अडचणी आल्यास अथवा काही सुचना करावयाची असल्यास त्यांनी आमच्याशी त्वरीत संपर्क करावा. कोणत्याही सुचना अथवा अडचणी ताबडतोब दुर केल्या जातील याची ग्वाही सातपुते यांनी यावेळी दिली.
या बैठकीस शहरातील विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.