फलटण लायंस मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटल च्या भूमिपूजनाचा भव्य कार्यक्रम आज सोमवार दि 9/9/19 रोजी पार पडला.
या कार्यक्रमासाठी डिस्ट्रिक्ट गवर्नर 1 mjf लायन देशपांडे सर यांच्या प्रमुख उपस्थितित व चेअरमन, कृषि उत्पन्न बाजार समिती फलटण चे श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते तसेच लायंस अध्यक्ष लायन अर्जुन घाडगे यांच्या अध्यक्षते खाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे ध्वजवंदन लायन योगेश प्रभुणे सचिव यांनी केले. त्यानंतर प्रास्तावना लायन रणजीत निंबाळकर यांनी केले. मान्यवर जेष्ठ पत्रकार अरविंद भाई मेहता यांनी लायंस क्लब बाबत आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर लायन अध्यक्ष लायन अर्जुन घाडगे साहेब यांनी मनोगत व्यक्त केले. त्या नंतर डिस्ट्रिक्ट गवर्नर 1 यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच फलटण चे मा श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर साहेब यांनी लायंस क्लब बाबत अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.
आभार प्रदर्शन ला सौ सुनीता कदम मैडम यानी केले.या प्रसंगी अनेक मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.