साखर कारखान्यांनी थकीत ऊस बिले त्वरीत द्यावीत अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहीष्कार टाकू – अशोकशेठ सस्ते

फलटण  दि. १० : तालुक्यातील ज्या कारखान्यांनी शेतकरी यांनी घातलेल्या ऊसाची थकीत बिले अजुनही दिली नाहीत त्या संबंधित कारखान्यांनी थकीत बिले त्वरीत द्यावीत. उर्वरीत थकीत बिले न दिल्यास येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर सर्व शेतकरी वर्गाला बरोबर घेऊन बहीष्कार घालण्यात येेणार असल्याचा इशारा उद्योजक व  फलटण नागरी  विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोकशेठ सस्ते यांनी दिला आहे. 
फलटण तालुक्यातील विविध समस्या व शेतकरी यांच्या अडीअडचणींबाबत येथील शासकीय विश्रामगृहात फलटण नागरी विकास प्रतिष्ठानचे वतीने अध्यक्ष अशोकशेठ सस्ते यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, स. रा. मोहीते , प्रा. रमेश आढाव, सुभाष भांबुरे, सुभाष सोनवलकर, वैभव गावडे, निलेश सोनवलकर , फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे ऊपाध्यक्ष सुरेश भोईटे, सचिव दिपक मदने ऊपस्थित होते.
फलटण एस टी स्टँडमधील अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाली असून याबाबत एस टी अधिकाऱ्यांचे लक्ष नाही फलटणकरांचे लक्ष नाही व येथील लोकप्रतिनिधींचेही लक्ष नाही. ग्रामीण भागातील अनेक महिला नोकरी निमित्ताने, आठवडा बाजार खरेदीसाठी अथवा अन्य कामानिमित्ताने फलटण येथे येतात. महिला व प्रवाशी यांना स्वच्छताग्रहाची कसलीही सोय येथे उपलब्ध नाही, फलटण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व  फलटण पंचायत समितीच्या सभापती या दोन्ही संस्थांवर महिला असतानाही त्यांना महिलांचे असणारे प्रश्न माहिती असून सुटले नाहीत याबद्दल अशोकशेठ सस्ते यांनी आश्त्चर्य व््यक्त केले. 
 ग्रामीण व फलटण शहरामधील महिलांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली असून नगर परिषदेने प्रामुख्याने महिला यांच्या याप्रश्नावर लक्ष देऊन स्वच्छता गृहांबाबतचा प्रश्न लवकर सोडवावा. फलटण शहरांमध्ये महीलांसाठी काय ऊपाय योजना करता येतील याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे असे अशोकशेठ सस्ते यांनी सांगितले. 
 शहरात असणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयानिय अवस्था झाली असून नगर परिषद व सबंधीत विभाग याकडे का लक्ष देत नाही असा सवाल उपस्थित करून रस्त्यावरील खड्डे केंव्हा बुजविले जाणार, रस्ते दुरुस्त केंव्हा केले जाणार याकडे कोणीच लक्ष देत नसलेने शहरातील जनता व  नागरीक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्ता दुरुस्तीबाबत लवकरात लवकर संबंधित विभागाने कार्यवाही करावी अशी मागणी अशोकशेठ सस्ते यांनी केली आहे. 
फलटण शहर व  तालुक्यातील जनतेला भेडसवणाऱ्या समस्यांचा पाढाच पत्रकार परिषदेत अशोकशेठ सस्ते यांनी वाचून संबंधित शेतकरी महिला व  जनतेचे प्रश्न सुटले नाहीत तर आगामी विधानसभा निवडणुकीवर सर्वांना बरोबर घेवून बहिष्कार टाकण्याचा इशारा सस्ते यांनी पत्रकार परिषदेत शेवटी दिला आहे. 
फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने मुंबई महानंदा डेअरी व पुणे येथील सकाळ प्रेस भेट देणेसाठी आयोजित अभ्यासदौऱ्याला ऊद्योजक अशोकशेठ सस्ते यांनी मिनिस्कूल बस मोफत उपलब्ध करून दिलेबद्दल त्यांचा फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघामार्फत सत्कार करण्यात आला.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!