फलटण, दि. ९ : फलटण शहर व परिसरातील महिला भाविक भक्त यांच्यासाठी लोकमत सखी मंच सातारा, मलठण गणेशोत्सव मंडळ, सकल संत सांप्रदायिक आणि सामाजिक विकास सेवा संघटना फलटण यांच्यावतीने भव्य सामुदायिक अथर्वशीर्ष पठण हजारो महिलांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.
येथील श्री सदगुरु हरिबुवा मंदिराशेजारील बाणगंगा नदी पुल फलटण येथे अथर्वशीर्ष पठण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी श्री गणेशमूर्तीची आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनतर लोकमतचे संस्थापक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून द्वीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. खा रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, डॉ प्रसाद जोशी, सौ. मंदाकिनी नाईक निंबाळकर, मंगलादेवी नाईक निंबाळकर, अशोकराव जाधव, ह भ प केशवमहाराज जाधव, पत्रकार नसीर शिकलगार, बबनराव निकम, अभिजित नाईक निंबाळकर, राजेंद्र नागटीळे, सखी मंचच्या कमिटी मेम्बर असिफा शिकलगार, कुंदा रुद्रभटे, शिला जगताप, मनीषा फलके, स्वाती कूतवल, सुनंदा रणवरे आदी उपस्थित होते.
सध्याच्या काळात सुख संपन्नता व आरोग्य संपन्नता आणि आयुष्य वर्धमानता व बौद्धिक विकास घडवणारे एकमेव जगत कल्याणकारी धार्मिक नामयज्ञ म्हणून बौद्धिक विधानानुसार अथर्वशीर्ष पठण असून गणपती म्हणजे अष्टसिध्दी, बुध्दीची प्रवक्ता आणि सवमांगल्याची अधिष्ठात्री देवता आहे. वैदिक असणार्या गणरायाची उपासना अथर्वशीर्ष पठणाने करण्यात आली . या मंगलमय समारंभास मोठ्या संख्येने महिलांनी रिमझिम पावसातही आवर्जुन उपस्थिती लावली होती.
अथर्वशीर्ष पठण समारंभास उपस्थित राहणार्या महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात आले. भाग्यवान महिलांना लोकमत सखी मंच आणि स्वराज उद्योग समूहातर्फे आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
अथर्वशीर्ष पठणाचे व्यासपीठ ह भ प पुष्पांताई कदम, ह भ प सुधाताई पटवर्धन, ह भ प रेवती गोसावी यांनी सांभाळून सर्वांकडून पठण करून घेतले.