फलटण : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आंतर्गत महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा दिनांक ३०/८/२०१९ ते ३१/८/२०१९ रोजी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय वडगाव येथे झाल्या.
या कबड्डी स्पर्धेत मुलींचे एकूण बावीस संघ सहभागी झाले होते व त्यामधून श्रीमंत शिवाजीराजे हॉर्टीकल्चर कॉलेज फलटण मधील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
या यशस्वी संघाचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदचे अध्यक्ष, मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी मा.श्री.निकम सर, अधिक्षक मा. श्री.श्रीकांत फडतरे सर यांनी खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.
तसेच श्रीमंत शिवाजीराजे हॉर्टीकल्चर कॉलेज फलटण व कृषी महाविद्यालय फलटण प्राचार्य डॉक्टर एस.डी. निंबाळकर आणि शिक्षक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या कबड्डी संघास प्रशिक्षक प्रा. पी. एस.सावंत, नितीन पठारे, प्रा. एन.बी.खुरंगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.