फलटण दि. ९ : महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीने व महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा परिषद लिपिकवगीय कर्मचारी संघटना यांच्या प्रलंबित व इतर संवैधानिक मागण्यांसाठी खंडाळा पंचायत समिती कार्यालयासमोर आज सोमवार दि. ९ सप्टेंबर रोजी काम बंद आंदोलन करुन संपामध्ये सहभागी होवून आपला पाठिंबा दिला आहे.
१९८२ – ८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी,
सव संवर्गातील सातव्या वेतन आयोगातील वेतन तरतूदह दूर कराव्यात. केंद्राप्रमाणे भत्ते मिळावेत. अनुकंपा भरती तात्काळ व विनाअट करावी. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती बालसंगोपन रजा व अन्य सवलती लागू करणे, राज्यातील सर्व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदोन्नती शैक्षणिक पात्रतेनुसार करण्यात यावी. शिक्षण व आरोग्य यांचेवर जीडीपी च्या ६ टक्के खर्च करण्यात यावा व आरोग्य सेवेचे खाजगीकरण बंद करावे. सव कर्मचार्यांची अजित रजा साठविण्याची कमाल मर्यादा काढण्यात यावी. शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येवू नये. आरोग्य विभागातील कामाचे तास निश्चित होईपर्यंत बायोमेट्रिक प्रणाली आणू नये. लिपिक व लेखा लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करुन समान पदनाम समान काम समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करावे. पदोन्नतीने व सरळ सेवेने करण्यात येणारी नियुक्ती यामधील प्रारंभिक वेतनातील तफावत दूर करण्यात यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती व सातारा जिल्हा परिषद लिपिकवगीय कर्मचारी यांच्या प्रलंबित विविध मागण्यांवर शासनाने सकारात्मक विचार करुन तातडीने सोडविण्याबाबतचे निवेदन आज दि. ९ सप्टेंबर रोजी खंडाळा पंचायत समिती गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले व तहसिलदार दशरथ काळे यांना देण्यात आले. सदरचे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पाठवून दिले जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
शासनाने आमच्या रास्त मागण्यांबाबत वेळेत दखल न घेतल्यास महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती व सातारा जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी राज्य संघटनेच्या सुचनांनुसार दि. ५ ते ८ सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून काम केले. आज दि. ९ सप्टेंबर रोजी एकदिवसीय संप करण्यात आला असून सदर संपात राज्यातील १० लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत.
शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास बुधवार दि. ११ सप्टेंबर पासून राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नाईलाजास्तव बेमुदत संपावर जातील व त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला शासन सर्वस्वी जबाबदार असेल असा इशारा महाराष्ट्र राज्य लिपिकवगीय कर्मचारी संघटना सातारा शाखा खंडाळा व महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती शाखा खंडाळा यांच्यावतीने निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे खंडाळा येथील अध्यक्ष पी. जी. भरगुडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे खंडाळा अध्यक्ष ता. स. यादव, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ खंडाळा अध्यक्ष ना. द. क्षीरसागर, नि. शा. शिंदे, न. र. काशिद, जी. भ. गाडे, नितीन पवार, जी. पी. आडे न. ब. नेवरे, खंडाळा लिपिक कर्मचारी संघटना अध्यक्ष नितीन शिंदे, उपाध्यक्ष किरण पाटणे, सचिव जितेंद्र गायकवाड, व सातारा जिल्हा उपाध्यक्ष राजू पठाण यांच्या सह्य़ा आहेत.