आसू/वार्ताहर :आसू ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची 228 वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी आसू ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते
भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या सन १८५७ च्या पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला.तो म्हणजे ‘उमाजी नाईक’. अशा नामक महाराष्ट्राच्या या थोर क्रांतीपर्वाला मानाचा मुजरा !