बरड येथील सरकारी जनावरांच्या दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले

फलटण : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील बरड येथील सरकारी जनावरांचे दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी डाॅ. दिलीप  महादेव नाझीरकर यांनी 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. 
    याबाबतची लाचलुचपत विभागाकडून मिळालेली माहिती अशी की शासनाच्या  कुक्कुटपालन पक्षी संगोपन योजने अंतर्गत उभारण्यात आलेल्या पोल्ट्री शेडबाबतच्या अनुदानाची फाईल वरिष्ठांना सादर करण्यासाठी २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. 
 तक्रारदार शेतकरी  यांच्या आईचे नावे असलेल्या १ हजार मांसल कुक्कुटपालन पक्षी संगोपन योजने अंतर्गत उभारण्यात आलेल्या पोल्ट्री शेडबाबत अनुदानाची फाईल वरिष्ठांना सादर करण्यासाठी बरड ता. फलटण येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप महादेव नाझीरकर (वय-50 वर्ष  सध्या राहणार टी.सी कॉलेज पाठीमागे बारामती जिल्हा पुणे तर  मूळ गाव खटकेवस्ती  गोखळी ता. फलटण)  यांनी तक्रारदार शेतकरी यांची दि. 4  रोजी पडताळणी केली असता 2  हजार 500 रुपयांची लाचेची मागणी केली होती. आज दि. 6 सप्टेंबर रोजी सापळा लावला असता तडजोड अंती 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना बरड येथील जनावरांच्या सरकारी दवाखान्यात दिलीप नाझीरकर यांना रंगेहात पकडले आहे. 
    डाॅ.दिलीप नाझीरकर यांच्या विरोधात फलटण शहर पोलिस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम व अपहरण अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 पुढील तपास पोलीस निरीक्षक आरीफा मुल्ला करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक (एसीबी) राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुषमा चव्हाण (एसीबी) उपाधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली संजय अडसूळ, प्रशांत ताटे, संभाजी काकटर, विशाल खरात, तुषार भोसले यांनी केली.
फलटण तालुक्यात लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईमुळे  अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!