फलटण दि. ५ : फलटण शहर व परिसरातील महिला भाविक भक्त यांच्यासाठी लोकमत सखी मंच सातारा, मलठण गणेशोत्सव मंडळ, सकल संत सांप्रदायिक आणि सामाजिक विकास सेवा संघटना फलटण यांच्यावतीने भव्य सामुदायिक अथर्वशीर्ष पठण समारंभाचे आयोजन रविवार दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता श्री सदगुरु हरिबुवा मंदिराशेजारील बाणगंगा नदी पुल फलटण येथे करण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्ध पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
सध्याच्या काळात सव सुख संपन्नता व आरोग्य संपन्नता आणि आयुष्य वधमानता व बौद्धिक विकास घडवणारे एकमेव जगत कल्याणकारी धार्मिक नामयज्ञ म्हणून बौद्धिक विधानानुसार अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम फलटण शहर व परिसरातील महिला भाविक भक्त यांच्या सहकार्याने संपन्न होणार आहे.
गणपती म्हणजे अष्टसिध्दी, बुध्दीची प्रवक्ता आणि सवमांगल्याची अधिष्ठात्री देवता असून वैदिक असणार्या गणरायाची उपासना अथर्वशीर्ष पठणाने करण्यात येणार आहे. या मंगलमय समारंभास महिलांनी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अथर्वशीर्ष पठण समारंभास उपस्थित राहणार्या महिलांमधून लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून महिलांना बक्षिस जिंकण्याची संधी या सामाजिक व धार्मिक उपक्रमांमधून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अथर्वशीर्ष पठण समारंभामध्ये सहभागी होण्यासाठी नगरसेवक अशोक जाधव, नसीर शिकलगार व ह. भ. प. केशवराव जाधव महाराज यांच्याशी संपर्क साधून आपले संपूर्ण नाव पत्ता व मोबाईल नंबरसह फार्म भरुन द्यावा असे आवाहन प्रसिद्धी पत्रकात करण्यात आले आहे.