लोणंद दि. ४ : लोणंद – सातारा रोडवर कोपर्डे ता. खंडाळा गावचे हद्दीत एस टी स्टॅन्डजवळ रात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास लोणंद पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीस असलेले पोलीस नाईक ( ब.न.582) अतुल श्रीरंग गायकवाड (रा.लोणंद पोलीस वसाहत ता. खंडाळा) यांचा ज्युपिटर दुचाकीचा अपघात होऊन रस्त्यावर पडुन डोक्याला मार लागुन जागीच मृत्यु झाला आहे.
लोणंद पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पो.ना. अतुल गायकवाड रात्री उशीरा लोणंदकडे येत असताना कोपर्डे गावचे हद्दीत बस स्टॅन्ड जवळ त्यांच्या दुचाकीला अपघात झाल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. या मार्गावरील मोठया वाहनांची वाहतुक बंद असल्याने अपघाताची माहीती लवकर समजली नाही त्यामुळे अपघातानंतर त्यांच्या डोकयाला व पायाला मोठी दुखापत होऊन मोठया प्रमाणावर रकत स्राव होऊन त्यांचा मृत्यु झाला. अपघाताची माहीती एका वाहन चालकाने दिल्यानंतर त्वरीत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी पोलीस स्टाफसह स्थळी धाव घेतली. मृतदेह पोस्टमार्टम साठी लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला .
साातार पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते , कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरूड यांनी घटनास्थळी भेट दिली. अतुल गायकवाड यांना दोन लहान मुली आहेत त्यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने त्यांच्या या अपघाती जाण्याने लोणंद शहरात हळहळ व्यक्त होत होती. या बाबतची फिर्याद पो. कॉ. श्रीनाथ कदम यांनी दिली असून पुढील तपास पो.ह. सपकाळ करीत आहेत.